शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:03 IST

मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या अंबाजोगाई : शहरातील सावरकर चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरे रस्त्यावरच ठाण ...

मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या

अंबाजोगाई : शहरातील सावरकर चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसलेली असतात. रस्त्याच्या मधोमध ही जनावरे बसत असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ व गुरांचा ठिय्या यामुळे वाहतूक व्यवस्था अनेकदा कोलमडते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गुरांना रस्त्यातून हटवावे. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

----------

लघु प्रकल्पांची दुरूस्ती रखडली

अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघु प्रकल्पांची दुरूस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अनेक छोटी व मोठी कामे या माध्यमातून व्हावीत. अनेक प्रकल्पांना गेट बसवणे, गेटची दुरूस्ती अशा कामांसाठी निधींची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही निधी प्राप्त न झाल्याने दुरूस्तीची कामे रखडली आहेत.

---------------------

आठ दिवसांआड पाणीपुरवठा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तरीही अंबाजोगाई शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याने वेळी-अवेळी केव्हाही पाणी सोडले जाते. कोणत्याच प्रभागाचा पाणी सोडण्याचा दिवस ठरलेला नसल्याने मनमानीपणे पाणी सोडले जाते. मुबलक पाणीसाठा असूनही आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

---------------

महावितरण बिलाचा ग्राहकांना शॉक

अंबाजोगाई : तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणकडून दिली जाणारी बिले अव्वाच्या सव्वा प्रमाणात देण्यात आली आहेत. कोणत्याही विद्युत पंपाला मीटर नसल्याने देण्यात येणारी बिले अंदाजाने देण्यात येतात. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कमी व्हॉर्स पॉवरच्या विद्युत मोटारी आहेत. अशा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात वीजबिले आली आहेत. महावितरणच्या या वीजबिलाच्या शॉकने वीजग्राहक त्रस्त झाले आहेत.

---------

श्वानांना चर्मरोगाची लागण झाल्याने भितीचे वातावरण

अंबाजोगाई : शहर व परिसरात अनेक प्रभागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या श्वानांच्या वाढत्या संख्येचा मोठा त्रास शहरवासियांना होत आहे. मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेले हे श्वान रहदारी करणाऱ्या व्यक्तींना भीतीदायक ठरू लागले आहेत. यातील अनेक श्वानांना चर्मरोगाची लागण झाल्याने ते भींतीला अंग घासत बसलेले असतात. याचा शहरवासियांना मोठा त्रास होऊ लागला आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.