शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

बीड जिल्ह्यातील दोन गावांना भेटी देऊन केंद्रीय पथकाच्या दुष्काळ दौऱ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 4:10 PM

 चारपैकी दोनच गावांच्या शिवारास भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.

ठळक मुद्दे केंद्रीय पथकाने ऐनवेळी आपल्या दौऱ्यात बदल करून दोन गावे वगळली जरुड येथे संधिप्रकाशातच शेतकऱ्यांशी चर्चा करून बीड गाठले.  

- सतीश जोशी

बीड : बीड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने ऐनवेळी आपल्या दौऱ्यात बदल करून चारपैकी दोनच गावांच्या शिवारास भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यांचा हा धावता दौरा जिल्ह्यात चर्चेचा ठरला. केंद्र शासनाच्या पथकाने ६ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात पाथरी, सोनपेठमार्गे दुपारी सव्वादोनच्या सुमारास प्रवेश केला.

हे पथक माजलगावमार्गे वडवणी तालुक्यातील खडकी, बीड तालुक्यातील कांबी या गावांची पाहणी करणार होते. परंतु, ऐनवेळी या गावांना वगळले. हे पथक मानवत, पाथरीहून पोहनेर, सिरसाळामार्गे रेवली (ता. परळी) येथे जाणार होते. यासाठी बीड जिल्हा पोलीस पथकाची जीप पोहनेरजवळील बीड जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे गोदावरी पुलावर उभी होती. परंतु, या पथकाने ऐनवेळी मार्ग बदलला. विटा, सोनपेठमार्गे हे पथक रेवली येथे गेले. पथकाला गाठण्यासाठी पीएसआय योगेश खटके यांच्या गाडीला धावपळ करावी लागली. रेवलीहून माजलगावच्या विश्रामगृहावर त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. परंतु, त्यांनी माजलगाव रद्द करून परळीच्या विश्रामगृहावर भोजन घेतले.

परळी तालुक्यातील रेवली येथील सरपंच मनोहर केदार यांच्या शेतास भेट दिली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर परळी विश्रमागृहावर जेवण करून सिरसाळा, वडवणी मार्गे  रस्त्यावरीलच बीड तालुक्यातील जरूड गावातील केशव काकडे यांच्या शेतास भेट देऊन इथेही जमलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. जरूडला येईपर्यंत सूर्यास्त झाला होता. संधिप्रकाशातच शेतकऱ्यांशी चर्चा करून बीड गाठले.  

दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या पथकात कोण ?दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकात केंद्रीय कृषी विभागाच्या योजना आयोगाचे सहसल्लागार मनीष चौधरी, पेयजल व स्वच्छता विभागाचे एस.सी. शर्मा, ग्रामविकास खात्याचे एस.एन. मिश्रा यांचा समावेश होता.  तसेच विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर,  उपायुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, कृषी अधीक्षक एम.एल. चपळेंसह महसूल, कृषी व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता. 

वैद्यनाथांचे दर्शनया पथकाचा बदललेला दौरा सोबत असणाऱ्या अनेकांना माहीत नव्हता. रेवलीहून हे पथक परळीत आले. वैद्यनाथांच्या दर्शनासाठी या पथकासोबत आलेला अधिकाऱ्यांचा ताफा पाहून मंदिरात भाविकांत कुतूहल निर्माण झाले. या सर्व अधिकाऱ्यांनी दर्शन घेऊन परळीचे विश्रामगृह  गाठले. 

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार