पाच दिवसांपासून विवाहिता होती बेपत्ता; घरी परतताच सासरच्यांनी जाब विचारत केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:02 IST2022-05-12T13:00:57+5:302022-05-12T13:02:22+5:30

कोणाला काहीही न सांगता घर सोडल्याने परत येताच महिलेस संतापलेल्या पती आणि सासरच्या मंडळीने बेदम मारहाण केली.

Married women missing for five days; When she returned home, her husband, father-in-laws killed her | पाच दिवसांपासून विवाहिता होती बेपत्ता; घरी परतताच सासरच्यांनी जाब विचारत केली हत्या

पाच दिवसांपासून विवाहिता होती बेपत्ता; घरी परतताच सासरच्यांनी जाब विचारत केली हत्या

कडा (बीड): पाच दिवसांपूर्वी कोणाला काहीही माहिती न देत घर सोडून गेलेली महिला परत येताच घरात वादंग उडाले. घरातून गायब होण्याचा जाब विचारत सासरच्या मंडळीने केलेल्या मारहाणीत विवाहितेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी शेरी बुद्रुक येथे घडली. मनिषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले ( २३ ) असे मृत महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील विवाहिता मनिषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले मागील पाच दिवसांपासून कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी अचानक सोनाली घरी परतली. यावेळी घरातून निघून जाण्याचे कारण विचारत पती, सासरा, दिराने सोनालीला मारहाण सुरु केली. मारहाणीत सोनालियाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत सोनालीची बहिण अश्विनी रमेश राळेभात (रा.जामखेड जि.अहमदनगर ) हिच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाण्यात पती बाबासाहेब अशोक वाघुले, सासरा अशोक नारायण वाघुले, दीर प्रकाश अशोक वाघुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली असून सासरा व दिर फरार आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करत आहेत. 

तीन तासांत आरोपी पतीच्या आवळल्या मुसक्या 
पत्नीचा खून करून पती बाबासाहेब फरार झाला होता. तो केरूळ येथे लपला असल्याची माहिती समजताच उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस याच्या मार्गदर्शनाखीली पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे यांनी होमगार्ड महेश जाधव, वाहन चालक पठाण यांच्या मदतीने शोध घेत अवघ्या तीन तासांत आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: Married women missing for five days; When she returned home, her husband, father-in-laws killed her