विवाहित प्रेमी युगुल सिंधुदुर्गमधून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:01 IST2019-07-29T01:00:41+5:302019-07-29T01:01:28+5:30

शहरातून एक विवाहित महिला तिच्या लहान मुलासह प्रियकरासोबत पळून गेली होती, तिच्या शोधात पोलीस होते. दरम्यान शनिवारी दुपारी सिंधदुर्ग येथून यां दोघांना ताब्यात घेतले

Married love couple takes over from Sindhudurg | विवाहित प्रेमी युगुल सिंधुदुर्गमधून ताब्यात

विवाहित प्रेमी युगुल सिंधुदुर्गमधून ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातून एक विवाहित महिला तिच्या लहान मुलासह बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. ही महिला तिच्या लहान मुलासह प्रियकरासोबत पळून गेली होती, तिच्या शोधात पोलीस होते. दरम्यान शनिवारी दुपारी सिंधदुर्ग येथून यां दोघांना ताब्यात घेतले व बीड येथे आणण्यात आले.
सिंधुदुर्गमधून ताब्यात घेतल्यानंतर या महिलेला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. ही विवाहित महिला तिच्या लहान मुलासोबत तिच्या विवाहित प्रियकरासोबत पळून गेली होती. याविषयी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबादास सौंदरमल व मीरा रेडेकर यांनी सायबर सेलच्या मदतीने त्या विवाहित महिलेच्या मोबाईल लोकेशनवरुन तपास सुरु के ला होता. ही महिला औरंगाबादला असल्याचे समजले. त्यानंतर औरंगाबाद येथे शोध घेतला मात्र, त्याठिकाणी ती सापडली नाही. त्यानंतर पुन्हा लोकेशन तपासले असता ती सिंधुदुर्ग येथे असल्याची माहिती मिळाली त्यानंतर सिंधदुर्ग येथे जाऊन महिलेस ताब्यात घेत बीडला आणले व तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

Web Title: Married love couple takes over from Sindhudurg