मराठा आरक्षणासाठी केजमध्ये बंद, रस्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 19:01 IST2018-07-20T19:00:51+5:302018-07-20T19:01:50+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी परळी येथे चालु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज बंद पाळण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी केजमध्ये बंद, रस्तारोको
केज (बीड ) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी परळी येथे चालु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज बंद पाळण्यात आला. तसेच आंदोलकांनी मोर्चा काढून एक तास रास्तारोको केले.
आंदोलनात सकल मराठा समाजासह सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार अविनाश कांबळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला. मराठा समाजाच्या आंदोलनास केज तालुका एम आय एम संघटनेने जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदविला होता.