माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांची दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 19:15 IST2023-10-28T19:12:46+5:302023-10-28T19:15:14+5:30
माजीमंत्री बदामराव पंडित हे मोहिमाता देवीच्या दर्शनसाठी येथे आले असता हा प्रकार घडला.

माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांची दगडफेक
गेवराई : शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मादळमोही येथे आज सायंकाळी मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. माजीमंत्री पंडित हे मोहिमाता देवीच्या दर्शनसाठी येथे आले असता हा प्रकार घडला.
तालुक्यातील मादळमोही येथील मोहिमाता देवीची यात्रा सुरू आहे. त्यानिमित्त माजीमंत्री बदामराव पंडित मोजक्या कार्यकर्त्यासोबत मोहिमाता देवीच्या दर्शनाला आज सायंकाळी आले. मंदिर परिसरात गाडी लावून माजीमंत्री पंडित आणि कार्यकर्ते दर्शनासाठी गेले.
दरम्यान, त्यांची गाडी उभी होती त्याच्या जवळच मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण स्थळ आहे. काही आंदोलकांनी पंडित यांच्या गाडीवर दगडफेक केली.यात गाडीची काच फुटली. यावेळी गाडीत कोणीच नसल्याने पुढील अनर्थ टळला. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठी गर्दी जमा झाली. त्यानंतर दर्शन घेऊन आलेले माजीमंत्री पंडित कार्यकर्त्यांसह गेवराईकडे निघून गेले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अद्याप कसलीही नोंद झाली नव्हती.