कुटुंबप्रमुखाचे कोरोनामुळे निधन झाल्यास मानवलोक करणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST2021-05-28T04:24:56+5:302021-05-28T04:24:56+5:30

कोरोनामुळे कमावत्या एकमेव कुटुंब प्रमुखांचे दुर्दैवी निधन झालेल्या कुटुंबांची माहिती मानवलोक संकलित करीत असून, त्यांच्या वारसाला मदत करण्यात ...

Mankind will help if the head of the family dies due to corona | कुटुंबप्रमुखाचे कोरोनामुळे निधन झाल्यास मानवलोक करणार मदत

कुटुंबप्रमुखाचे कोरोनामुळे निधन झाल्यास मानवलोक करणार मदत

कोरोनामुळे कमावत्या एकमेव कुटुंब प्रमुखांचे दुर्दैवी निधन झालेल्या कुटुंबांची माहिती मानवलोक संकलित करीत असून, त्यांच्या वारसाला मदत करण्यात येणार असल्याची माहिती कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी दिली. लोहिया म्हणाले, कोरोनामुळे अनेक कुटुंब प्रमुखांचे दुर्दैवी निधन झाले आहे. अशा कुटुंबांची परिस्थिती चिंताजनक बनते. त्यांच्यासाठी काही करता येईल का, यासाठी मानवलोक प्रयत्नशील आहे. कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या कुटुंब प्रमुखांची माहिती मानवलोक संकलित करीत आहे. निधन झालेली व्यक्ती ही कुटुंबातील एकमेव कमवती व्यक्ती होती आणि ती दुर्दैवाने कोरोनामुळे निधन पावली असेल फक्त अशाच कुटुंबांना मदत देता येईल. ही मदत मोजक्याच कुटुंबांपुरती मर्यादित असेल. ही मदत फक्त दुसऱ्या कोरोना लाटेत दुर्दैवी निधन झालेल्या कुटुंब प्रमुखांसाठी असल्याचे सांगण्यात आले. ही मदत कोरोनामुळे निधन झालेल्या कुटुंब प्रमुखांसाठी आहे. कुटुंबातील इतर सदस्यांसाठी देता येणार नाही, असेही कळविण्यात आले. यासाठी गुगल फॉर्ममधील सर्व माहिती भरणे अत्यावश्यक असेल.

माहिती सबमिट करण्यापूर्वी ती तपासून खात्री करूनच भरावी. एका व्यक्तिसाठी फक्त एकच फॉर्म भरता येईल, दुसरा फॉर्म गृहीत धरण्यात येणार नाही. फॉर्म भरलेल्या सर्वांना मदत मिळेलच असे गृहीत धरू नये. माहितीची पडताळणी, मदतीची उपलब्धता व मर्यादा लक्षात घेता उपलब्ध क्षमतेनुसार मदत देण्यात येणार आहे.

Web Title: Mankind will help if the head of the family dies due to corona