शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Manjara River Flood : मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या १८ जणांना काढले सुखरूप बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 18:45 IST

Manjara River Flood धनेगाव येथील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने धरणाच्या खाली असलेल्या गावात महापूर आलेला आहे.

केज : अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतात पाणी घुसून पुरुष, महिला व लहान बालके असे १८ व्यक्ती शेतात असलेल्या घरावर अडकले होते.  आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देऊन रेस्क्यू टीम पाठवीण्याचे सांगितले होते. त्यानुसार बीड येथून आलेल्या रेस्क्यू टीमने पाण्यात अडकलेल्या लोकांसह जनावरांना सुखरूप बाहेर काढले.  

धनेगाव येथील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने धरणाच्या खाली असलेल्या गावात महापूर आलेला आहे. त्याचा सर्वात जास्त फटका आपेगाव ला बसला आहे. या पुराच्या पाण्यात अर्धे आपेगाव गेले आहे. बालाजी बाजीराव तट, दत्ता काळदाते, मनोज काळदाते यांच्या शेतात काम करणारे सालगडी व त्यांचे कुटुंब पाण्यात अडकले होते. या तिघांच्याही शेतातील सालगडी व त्यांचे कुटुंब असे १८ पुरूष, महिला व लहान बालके बालाजी तट यांच्या शेतात असलेल्या घराच्या स्लॅपवर बसले होते. तर जनावरेही गोठ्यात होते. पाण्याचे प्रमाण वाढू लागल्याने व हे शेत गावापासून एक किलोमीटर अंतरावर असल्याने त्या ठिकाणी कसलाही संपर्क होत नव्हता. या लोकांना वाचवण्यासाठी बीड येथील रेस्क्यू टीम दाखल झाली होती या रेस्क्यू टीमने पाण्यात अडकलेल्या १८ लोकांना तसेच  जनावरे, कुत्रे व  शेळ्या यांना सुखरूप बाहेर काढले लोकांना सुखरूप वाचवील्याने या टीमचे अभिनंदन व सत्कार अपेगावकरांच्या वतीने  करण्यात आला.

गावकऱ्यांनी केली मदत 

बीड यातून आलेल्या रेस्क्यू टीमला गावकऱ्यांनी  मदत केली. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कचरू रंजवे, निलेश शिंदे यांनी यांनी या कामी सहकार्य केले.

यांना वाचवीले -

प्रकाश परशुराम मोरे   ४० गोवर्धन प्रकाश मोरे  ३४शुभम प्रकाश मोरे १८प्रांजली प्रकाश मोरे  १२   किरण प्रकाश मोरे ११ बबन सुदाम जाधव  ४५ बालाजी बबन जाधव २४ कान्होपात्रा बबन जाधव ३९लक्ष्मी बबन जाधव १८  परमेश्वर कचरू थावरे  २६दिपाली परमेश्वर थावरे २३ संघर्ष परमेश्वर थावरे ०३यादव तुळशीराम  लाखुने ३६कल्पना यादव लाखुने ३४ ओमकार यादव लाखुने १३ पुजा यादव लाखुने ११ कौशल्याबाई तुळशीराम लाखुने ६०कचरू सोपान दळवी ५०

टॅग्स :RainपाऊसBeedबीड