शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

माणिकशाह देवस्थान जागा प्रकरण; माजलगाव धरणाच्या भिंतीवर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

येथील ऐतिहासिक माणिकशाह बाबाच्या जागेवरील झालेले अतिक्रमण तात्काळ काढून हद्द व खुणा निश्चित करून घ्याव्यात, या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता ...

येथील ऐतिहासिक माणिकशाह बाबाच्या जागेवरील झालेले अतिक्रमण तात्काळ काढून हद्द व खुणा निश्चित करून घ्याव्यात, या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्यावतीने जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव धरणाच्या भिंतीवर भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

माजलगाव धरणामधील देवस्थान माणिकशाह बाबाची दर्गा धरण निर्मिती वेळेस १९७९ ते १९८० मध्ये पाडण्यात आली व त्यावेळी शासनाने या पवित्र देवस्थानाचे अवशेष सर्व्हे नं. ८ मध्ये ४ एकर जमीन घोषित करून याठिकाणी ठेवण्यात आले. परंतु, चिंचगव्हाण ग्रामपंचायत व माजलगाव तहसीलच्या मेहेरबानीने या देवस्थानाच्या ४ एकर जमिनीवर अतिक्रमणे वाढत गेले. याविषयी तात्कालीन सात हजार आंदोलकांनी आंदोलन करून, अटक होऊनदेखील या देवस्थानाच्या साहित्याची निगराणी करण्यात आली नाही.

चिंचगव्हाण ग्रामपंचायत अतिक्रमणधारकांचे संरक्षण करून याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची व खोटी माहिती देतात. चिंचगव्हाण पुनर्वसनमध्ये जवळपास ४३ एकर जमीन शासनाची गायरान देण्यात आली. यामध्ये मंदिर, मशीद, स्मशानभूमी, कब्रस्तान, समाज मंदिर, ईदगाह, चावडी, दर्गा यांना पुनर्वसन करण्यात आले. परंतु, दर्गा, मशीद, कब्रस्तान, ईदगाह यांची जागा कोठे गेली? असा सवालही सलीम बापू यांनी केला. शासनाने ऐतिहासिक देवस्थान माणिकशाह बाबा यांना योग्य न्याय देऊन देवस्थानची जमीन रिकामी करून ताबा देण्यात यावा. हद्द, खुणा व निश्चित करण्यात यावे, अन्यथा लोकतांत्रिक जनता दलाच्यावतीने सोमवारी सकाळी माजलगाव धरणावर सय्यद सलीम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर हे भव्य आंदोलन केले.

यावेळी नायब तहसीलदार निळेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

050721\purusttam karva_img-20210705-wa0052_14.jpg