गावठी कट्ट्यासह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:51 IST2019-04-27T00:50:36+5:302019-04-27T00:51:07+5:30

विनापरवाना गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या युवकास पोलीसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजीनगर ठाणे हद्दीत दरोडा प्रतिबंधक पथकाने केली.

A man was arrested along with a piece of cloth | गावठी कट्ट्यासह एकाला अटक

गावठी कट्ट्यासह एकाला अटक

बीड : विनापरवाना गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या युवकास पोलीसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजीनगर ठाणे हद्दीत दरोडा प्रतिबंधक पथकाने केली.
जगदीश बाबासाहेब काळवणे (२० रा.थिगळे गल्ली, बीड) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री मध्यवर्ती कारागृहाकडील रस्त्यावर तो फिरत असताना त्याला ताब्यात घेतले. पो.ना. मनोज वाघ यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आलो. ही कारवाई सपोनि गजानन जाधव, मनोज वाघ, अशोक दुबाले, सुबराव जोगदंड यांनी केली.

Web Title: A man was arrested along with a piece of cloth