शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: पारडे होते जड तरीही बीडमध्ये पराभव का? पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर 

By सोमनाथ खताळ | Updated: June 6, 2024 12:27 IST

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी निसटता पराभव केला.

बीड : लोकसभा निवडणुकीत बीडचा निकाल धक्कादायक आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी निसटता पराभव केला. गेवराई व केज मतदारसंघात  मुंडे पिछाडीवर पडल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाही आमदारांचे टेन्शन वाढले आहे.

 जिल्ह्यात बीड, केज, माजलगाव, गेवराई, आष्टी आणि परळी असे सहा मतदारसंघ आहेत. यातील केजमध्ये नमिता मुंदडा तर गेवराईमध्ये ॲड. लक्ष्मण पवार हे भाजपचे आमदार आहेत. अजित पवार गटाचे परळीत धनंजय मुंडे, माजलगावात प्रकाश सोळंके आणि आष्टीत बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत. विधान परिषदेवरही भाजपचे सुरेश धस आमदार आहेत. शरद पवार गटाकडे केवळ बीडचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार आहेत. 

धनंजय मुंडे सोबत असतानाही...२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे हे बजरंग सोनवणे यांच्यासोबत होते. परंतु यावेळी महायुतीत असल्याने ते बहीण पंकजा मुंडे यांच्यासोबत होते. सोबतच दोन आमदारही होते. त्यामुळे पारडे जड समजले जात असताना पंकजा यांचा झालेला पराभव धक्कादायक आहे.

आता पंकजा यांचे पुढे काय?पंकजा यांना उमेदवारी मिळाल्याने डॉ. प्रीतम मुंडे यांचा पत्ता अगोदरच कट झाला होता. त्यांना विस्थापित होऊ देणार नाही, असा शब्द पंकजा यांनी दिला होता. परंतु, आता पंकजा यांचाच पराभव झाल्याने त्याच विस्थापित झाल्याची चर्चा आहे. आता त्यांची पुढची भूमिका काय असणार? याकडे लक्ष लागले आहे.

उमेदवारांना मतदारसंघनिहाय पडलेली मतेउमेदवार    गेवराई    माजलगाव    बीड    आष्टी    केज    परळी    टपालीपंकजा मुंडे    ९५,४०९    १५,६४८    ७७,६०५    १,४५,५५३    १,०९,३६०    १,४१,७७४    २,०४८ बजरंग सोनवणे    १,३४,५०५    १,०४,७१३    १,३९,९१७    १,१३,२९९    १,२३,१५८    ६६,९४०    १,४१८ 

हा निकाल अनपेक्षित आहे. तरीही मी डळमळीत नाही. जेवढी मते मिळाली, त्यात आनंदी आहे. या विजयामुळे विरोधकांचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल. याचे परिणाम विधानसभेत होतील. त्यामुळे सहज घेऊन चालणार नाही. महायुतीच्या नेत्यांना आता रणनीती आखावी लागेल आणि ते आखतील, असा विश्वास आहे. - पंकजा मुंडे, बीड

टॅग्स :beed-pcबीडPankaja Mundeपंकजा मुंडेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल