शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Maharashtra Election 2019 : काश्मीरला विकास प्रवाहात आणले; अमित शहांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 6:06 AM

पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात अमित शहा बोलत होते.

बीड : देशातील जनतेने आमचे ३०२ खासदार निवडून दिले. आपल्या या शक्तीच्या जोरावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम हटविले आणि काश्मीरला भारताच्या विकास प्रवाहात आणले; परंतु या ३७० कलम रद्द करण्याला काही मंडळी विरोध करीत आहेत. विरोध करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणार का नाही, असा सवाल भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात अमित शहा बोलत होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मेळाव्याला ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. काश्मीरविषयक राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केल्याबद्दल अमित शहांना ३७० तोफांची सलामी देण्यात येणार होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याऐवजी सभास्थळी ३७० जणांनी तिरंगा झेंडा फडकावून गृहमंत्री शहा यांचे स्वागत केलेअमित शहा म्हणाले, भगवानबाबांनी आयुष्यभर दीनदुबळे, वंचितांसाठी संघर्ष केला. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. शिक्षणानेच प्रगती होते, हे त्यांनी कृतीद्वारे दाखवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगार, मजूर यांच्या प्रगतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला होता. तेच कार्य आज पंकजा मुंडे पुढे नेत आहेत. ७० वर्षांपासून ओबीसी समाज आपल्या हक्कासाठी लढत होता.पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र आयोग निर्माण करून त्यांच्यासाठी विकासाची दारे खुली केली. त्यांना संवैधानिक दर्जा प्राप्त करून दिला. वंचित समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत.‘पंकजा मुंडे सीएम...’सभेच्या एका कोपºयातून ‘सीएम, सीएम... पंकजा मुंडे सीएम’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. अमित शहा यांचे भाषण संपेपर्यंत ही घोषणाबाजी सुरू होती. घोषणा देणाऱ्यांच्या बाजूने काही सुरक्षारक्षक जात असताना अमित शहा यांनी त्यांना रोखले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड