शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Maharashtra Election 2019: मुंडे भाऊ-बहिणीतील कलह पोहोचला पोलीस ठाण्यापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 06:33 IST

Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीत परळीतील राजकारण नव्या वळणावर

- सतीश जोशी बीड : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या भाऊ बहिणीतील राजकीय संघर्ष या विधानसभा निवडणुकीत पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर मर्यादांचे सर्व संकेत तोडले गेल्याचे चित्र दिसले.दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा म्हणून बीडची आणि विधानसभा मतदारसंघ म्हणून परळीची ओळख. २००९ पासूनच मुंडे कुटुंबात धूसफूस होती. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी विधानसभेच्या जागेवर धनंजय मुंडे यांनी हक्क सांगितला. परंतु, उमेदवारी पंकजांना मिळाली.

गंगाखेडमध्ये धनंजय यांचे मेहुणे डॉ. मधुसूदन केंद्रे यांना भाजपची उमेदवारी देऊन बंधू पंडितअण्णा यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. परंतु, २००९ मध्ये गंगाखेडमध्ये डॉ. केंद्रे पराभूत झाले आणि परळीत पंकजा विजयी झाल्या. पुढे कलह वाढतच गेला आणि पंडितअण्णा, जावई डॉ. केंद्रे आणि धनंजय यांनी राष्टÑवादी काँग्रेस जवळ केली. घर फुटले आणि पंकजा-धनंजय यांच्यातील राजकीय संघर्ष वाढतच गेला. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर सहा महिन्यांतच विधानसभा निवडणूक लागली. २०१४ मध्ये परळीत भाऊ-बहिणीत लढत होऊन पंकजा जवळपास २५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या.

धनंजय मुंडे यांच्यासाठी २०१९ ची निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. बीड जिल्ह्यातील सत्तासंघर्षात पंकजांनी धनंजय यांना तोंडघशी पाडले होते. स्थानिक स्वराज संस्था आणि केज विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने जाहीर केलेले उमेदवार पंकजा यांनी भाजपमध्ये आणले. पंकजांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी धनंजय यांनी आक्रमक प्रचार सुरू केला. सोशल मीडियाचा आधार घेत पंकजांवर आरोप होऊ लागले.

‘राजकारणातून संपविण्यासाठी पंकजांनी मला आणि माझ्या पत्नीला कसा त्रास दिला, जगमित्र सूतगिरणी प्रकरणात मी, बहीण आणि पत्नीवर गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात माझ्या पत्नीला अटक करावी म्हणून पोलिस अधिकाऱ्यांना फोन केले, दूष्ट राक्षस म्हणून संबोधले’, अशा कितीतरी कौटुंबिक गोष्टींचा आरोप धनंजय यांच्या भाषणातून या निवडणुकीत पंकजांवर होऊ लागला. सोशल मीडियाचा वापर वाढला. शेवटच्या दोन दिवसांत विकासाचा मुद्दा बाजूला झाला. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप होऊ लागले.

१७ आॅक्टोबर रोजीच्या एका भाषणातील धनंजय यांनी पंकजांबद्दल केलेले विधान व हावभाव याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यावर ‘मी असे बोललोच नाही, ही क्लिप हेतूपुरस्सर एडिट करून माझी बदनामी केली’. हे सांगताना पत्रकार परिषदेत धनंजय यांना अश्रू आले.

पंकजांनी प्रचाराच्या समारोपीय भाषणात धनंजय यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांचे सर्व आरोप खोडून काढले. यावेळी त्या खूपच भावनिक झाल्या होत्या. त्यातच डी-हायड्रेशन, दगदग यामुळे त्यांना व्यासपीठावरच अस्वस्थ वाटून भोवळ आली. त्यानंतर भाजप शहराध्यक्षांनी क्लिपच्या संदर्भात धनंजय यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद झाला. आष्टी आणि परळीत पंकजा यांच्या समर्थनार्थ मतदानाच्या एक दिवस आधी मोठा जमाव रस्त्यावर उतरला. या निवडणुकीचा निकाल काहीही लागो, बहीण-भावातील नात्याचे अंतर मात्र वाढतच चालले आहे, हेच खरे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019