शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Assembly Election 2019 : गोपीनाथ गडाचा आशीर्वाद घेऊन धनंजय मुंडे यांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 17:35 IST

जन्मगाव नाथरा येथे ग्रामदैवताचे दर्शन व गावातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले.

परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडेंनी आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान दुपारी परळी शहरातून रॅली व जाहीर सभेने मुंडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. 

आज सकाळी धनंजय मुंडे यांनी परळी येथे प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले, त्यानंतर जन्मगाव नाथरा येथे ग्रामदैवताचे दर्शन व गावातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले. दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या गोपीनाथगड येथील समाथीस्थळी तसेव वडील दिवंगत पंडीतअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून त्यांनी दर्शन घेतले. नाथरा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासही त्यांनी अभिवादन केले. तसेच आई रूक्मीणबाई मुंडे व कुटुंबियांनीही त्यांचे औक्षण करून शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यानंतर त्यांनी तहसिल कार्यालयात जावून उमेदवारी अर्जाचे 4 संच दाखल केले. 

यावेळी माजी मंत्री पंडीतराव दौंड, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, माकपचे नेते कॉ.पी.एस.घाडगे, काँग्रेसचे नेते संजय दौंड, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, दत्ताआबा पाटील, जि.प.सदस्य अजय मुंडे, डॉ.संतोष मुंडे, वाल्मिकअण्णा कराड, प्रा.मधुकर आघाव, रा.काँ.तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, रणजित लोमटे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे, ज्येष्ठ नेते सोमनाथअप्पा हालगे, उपनगराध्यक्ष अय्यूबभाई पठाण, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, एस.एल.देशमुख, कृ.उ.बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.गोविंद फड, पं.स.सभापती मोहनराव सोळंके, सुर्यभान मुंडे, माणिकभाऊ फड, प्रा.विनोद जगतकर, माऊली गडदे, सुंदर गित्ते, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वांच्या आशीर्वादाने जिंकुमतदार संघातील प्रत्येक समाज घटकाचा आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे. या आशीर्वादाच्या बळावर आपण विकासाची ही लढाई लढत असून, त्यात आपल्याला नक्की यश मिळेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Dhananjay Mundeधनंजय मुंडेparli-acपरळी