The loaded car collided with the tanker across the divider; Four killed in horrific accident | भरधाव कार दुभाजक ओलांडून टँकरवर आदळली; भीषण अपघातात वंचितचे ४ पदाधिकारी ठार

भरधाव कार दुभाजक ओलांडून टँकरवर आदळली; भीषण अपघातात वंचितचे ४ पदाधिकारी ठार

ठळक मुद्देचालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात 

गेवराई : चालकाचा ताबा सुटल्याने लातुरहून औरंगाबादकडे जाणारी कार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या एका टँकरवर धडकली. या भीषण अपघात कारचा चुराडा झाला असून त्यातील चार जण ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात गेवराईजवळील बायपास रोडवर गुरूवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. मृत आणि जखमी हे लातूर येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

लातूरहून पाच जण एका कारने ( एमएच  ४६ बी ९७०० ) औरंगाबादकडे जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास गेवराईजवळील बायपास रोडवर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगातील कार दुभाजक ओलांडुन समोरच्या रस्त्यावर गेली. यावेळी कार समोरून टँकरवर ( जीजे १६ एयु २४७५ ) आदळली. यात कारचा चुराडा झाला आणि त्यातील पाचही जण गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी ३ जण उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

दोघांना पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकजण गंभीर असून त्यावर उपचार सुरु आहेत. मृत आणि जखमीचे नाव समजू शकले नसून मृतांमध्ये लातुर येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

Web Title: The loaded car collided with the tanker across the divider; Four killed in horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.