Beed: न्यायालय परिसरात तक्रारदाराशी चर्चा करताना हृदयविकाराचा झटका, वकिलाचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:54 IST2025-06-25T17:53:49+5:302025-06-25T17:54:20+5:30
न्यायालय परिसरातील सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

Beed: न्यायालय परिसरात तक्रारदाराशी चर्चा करताना हृदयविकाराचा झटका, वकिलाचे निधन
अंबाजोगाई : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात तक्रारदाराशी चर्चा करताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ॲड. कमलकिशोर पारीख (वय ४२) यांचे निधन झाले. ॲड. पारीख यांनी सोमवारी सकाळपासून न्यायालयीन कामकाज व्यवस्थित आटोपले.
दुपारी मध्यंतराच्या कालावधीत न्यायालयातच आपल्या सहकाऱ्यांसमवेत जेवण केले. त्यानंतर ते एका प्रकरणातील तक्रारदारांशी चर्चा करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी न्यायालय परिसरातील सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ॲड. पारीख हे भावठाणा येथील मूळ रहिवासी असून त्यांच्या आई या विद्यमान सरपंच आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.