शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षी १७५ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; १५ प्रस्ताव ठरले अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:33 IST

बीड : राज्यात कर्जबाजारीपणामुळे २५ वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या झाली होती. त्यानंतरदेखील हे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याला ...

बीड : राज्यात कर्जबाजारीपणामुळे २५ वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या झाली होती. त्यानंतरदेखील हे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते. १ जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० अखेरपर्यंत १७५ शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केल्याची नोंद शासनदरबारी आहे. यातील जवळपास १५ प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले असून, १५१ जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. मात्र, कुटुंबांना इतर लाभ देण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

नापिकी दुष्काळी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासह इतर अनेक कारणांमुळे मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील शेतकऱी आत्महत्येची प्रकरणे वाढत आहेत. या आत्महत्या होऊ नयेत, यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये शासनाकडून पात्र आत्महत्या ठरली तर, एक लाखांच्या मदतीसोबतच कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह इतर काही विभागांतून त्या कुटुंबास विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाते.

२०१९ साली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही २१६ इतकी होती. तर, २०१८ या वर्षात ही संख्या १८७ इतकी होती. तरीदेखील आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून कार्यक्रम राबवला जात नाही. असे कार्यक्रम राबवले तरी त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या केली जात नसल्याचे दिसून येते.

शेतकरी आत्महत्येला आज ३५ वर्षे पूर्ण

२०१९ आत्महत्या २१६ पात्र १९७

२०२० आत्महत्या १७५ पात्र १५१

पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या - अपेट

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीमालावरील निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे. शेतीचे खुलीकरण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांवर सर्व प्रकारचे कर्ज शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झाल्यामुळे सर्व प्रकारच्या कर्जातून त्याची मुक्तता करणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईप्रमाणे शेती पिकालादेखील त्या पटीत भाव मिळणे गरजेचे आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या समितीने दिलेल्या शिफारशी लागू कराव्यात, असे मत शेतकरी संघटनेचे कालिदास अपेट यांनी व्यक्त केले आहे.

व्यवस्थेच्या छाताडवर नाचून हक्क मिळवणे गरजेचे

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे हे प्रगतशील शेतकरी होते. मात्र, काही कारणास्तव तत्कालीन शासनाने वेळोवेळी नोटिसा देऊन त्यांच्या शेतातील विद्युतप्रवाह खंडित केला होता. हा अपमान सहन न झाल्यामुळे साहेबराव करपे व मालती करपेंसह सहा जणांनी आत्महत्या केली होती. तीच परिस्थिती या शासनाच्या काळातदेखील असून, तशाच पद्धतीने विद्युतप्रवाह खंडित करण्याचे काम सुरू आहे. परंतु, आता शेतकऱ्यांनी खचून न जाता व्यवस्थेच्या छाताडावर नाचून आपले अधिकार हस्तगत करावेत तर, शेतकरी आत्महत्या थांबतील. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी व्यक्त केले आहे.