ग्रामीण भागात लालपरी परतली; चालक-वाहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 15:58 IST2021-10-13T15:58:36+5:302021-10-13T15:58:53+5:30

कोरोना प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या.

Lalpari Bus returned to rural areas; Welcome to the driver-carrier with roses | ग्रामीण भागात लालपरी परतली; चालक-वाहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

ग्रामीण भागात लालपरी परतली; चालक-वाहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

कडा ( बीड ) :  जवळपास १८ महिने मुक्काम केलेल्या आष्टी आगाराच्या लालपरी ग्रामीण भागातील काही गावात आज धावली. यावेळी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी चालक व वाहक यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. 

कोरोना प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. ब्रेक दि चेन अंतर्गत आता शाळा, महाविद्यालय पर्यटनस्थळे सुरु  झाली आहेत. तसेच कोरोना रुग्ण कमी झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात काही ठिकाणच्या बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. 

आज आष्टी आगारातुन कडा-सराटेवडगांव, कडा-देवळाली, कडा-सावरगांव, कडा-मेहकरी, कडा-धामणगांव, कडा-मिरजगाव  या मार्गावर दोन  बस धावल्या. यामुळे प्रवासी, विद्यार्थी यांची गैरसोय दुर झाली आहे. 
 

Web Title: Lalpari Bus returned to rural areas; Welcome to the driver-carrier with roses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.