कारागृहातील सुभेदारास जुन्या कैद्याकडून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:23 AM2018-10-03T00:23:37+5:302018-10-03T00:24:17+5:30

कारागृहात असलेल्या कैद्याची तुरुंग अधीक्षकांकडे तक्रार केल्याच्या कारणावरुन कैद्याच्या नातेवाईकांनी सुभेदाराशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली़ ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजता घडली कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ घडली.

Jailed Prisoner Pushing Old Prisoner | कारागृहातील सुभेदारास जुन्या कैद्याकडून धक्काबुक्की

कारागृहातील सुभेदारास जुन्या कैद्याकडून धक्काबुक्की

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कारागृहात असलेल्या कैद्याची तुरुंग अधीक्षकांकडे तक्रार केल्याच्या कारणावरुन कैद्याच्या नातेवाईकांनी सुभेदाराशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली़ ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजता घडली कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ घडली.
अनिल पांडुरंग साळवे (४८) हे जिल्हा कारागृहात सुबेदार म्हणून कर्तव्यावर आहेत़ कारागृहात जुबेर खान समद याचा नातेवाईक कैदी आहे़ या कैद्याची तक्रार साळवे यांनी कारागृह अधीक्षक महादेव पवार यांच्याकडे केली होती़ कर्मचारी वसाहतीच्या प्रवेशद्वारावर सुभेदार अनिल साळवे यांना गाठून तक्रार का केली? असा जाब विचारत जुबेर समद खान व इतर दोन अनोळखी यांनी त्यांना ढकलून दिले़ त्यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन ते पसार झाले़
या प्रकरणी सुबेदार साळवे यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली़ त्यावरुन शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला़ तपास सहायक फौजदार हरिश्चंद्र गिरी करत आहेत़ कैद्याच्या नातेवाईकांनी कारागृह कर्मचाºयाला धमकावल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Jailed Prisoner Pushing Old Prisoner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.