शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू, बागायतीसाठी एकात्मिक शेती पद्धती फायदेशीर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : कोरडवाहू, बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करावा. ही पद्धती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : कोरडवाहू, बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करावा. ही पद्धती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, असे प्रतिपादन असे परभणी येथीेल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. वासुदेव नारखेडे यांनी केले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव व किसान ॲपच्या माध्यमातून २७ मे रोजी ‘कोरडवाहू आणि बागायती करिता एकात्मिक शेती पद्धती’ या विषयावर शुक्रवारी एकदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. देवराव देवसरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सय्यद इस्माईल, प्रा. किशोर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. पशुपालन, चारापिके त्याचे वाण, शेळीपालन, मत्स्यशेती, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, तुती लागवड इत्यादी शेतीपूरक व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे? याविषयी माहिती डॉ. नारखेडे यांनी दिली.

डॉ. सय्यद इस्माईल यांनी शेतकऱ्यांनी शेतीपूरक इतर व्यवसाय करावे. जेणे करून आर्थिक उलाढाल वाढेल असा सल्ला दिला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. देवसरकर यांनी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला जोडधंद्याची नितांत गरज आहे, असे सांगितले. प्रा. किशोर जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहभागी शेतकऱ्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. हनुमान गरुड यांनी केले. आभार दीपक इंगळे यांनी मानले.