घरात एकटी असल्याचा फायदा घेत भोळसर मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 18:02 IST2021-05-19T18:00:39+5:302021-05-19T18:02:11+5:30
crime news in Beed पीडित मुलीची तब्येत बिघडल्याने एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले असता तपासणीत झाले उघड

घरात एकटी असल्याचा फायदा घेत भोळसर मुलीवर अत्याचार
माजलगाव (जि. बीड) : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका १९ वर्षीय भोळसर मुलीवर सतत दोन महिने अत्याचार करण्यात आला. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली असून आरोपी विरोधात १७ मे रोजी रात्री उशिरा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यातील एका गावात एका १९ वर्षीय भोळसर मुलीसह तिचे आई, वडील राहतात. मुलीला घरी ठेवून ते मजुरीसाठी दुसऱ्याच्या शेतात काम करण्याकरिता गेले असता, याच गावातील पाच मुलांचा बाप असणाऱ्या एका इसमाने ११ मार्च रोजी घरात घुसून सदरील मुलीवर अत्याचार केला होता. दरम्यान, पीडित मुलीची तब्येत बिघडल्याने एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले.
तिची तपासणी करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. पीडित मुलीच्या पालकाने मुलीकडे याबाबत चौकशी केली. त्यावेळी मुलीने गावातील अन्सार गफूर पठाण हा गेल्या दोन महिन्यांपासून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करत होता. ही बाब कुणाला सांगितली तर, तुझ्या आई-वडिलांनाही जीवे मारीन म्हणून धमकी देत होता, असे सांगितले. पीडित भोळसर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी अन्सार गफूर पठाणविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. प्रभा पुंडगे करत आहेत.