बीड जिल्ह्यात झुंडशाहीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:41 PM2019-06-28T23:41:21+5:302019-06-28T23:41:47+5:30

झारखंडमध्ये झुंडशाहीचा बळी ठरलेल्या तबरेज अन्सारी याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात शुक्रवारी बीड, आष्टी, गेवराई, केज, परळी आणि धारूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले, तर माजलगाव, अंबाजोगाई, पाटोदा आणि सिरसाळा मोर्चे काढण्यात आले.

Inhibition of bunch in Beed district | बीड जिल्ह्यात झुंडशाहीचा निषेध

बीड जिल्ह्यात झुंडशाहीचा निषेध

Next
ठळक मुद्देतबरेजला न्याय द्या : बीडमध्ये धरणे, अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा; धारूरमध्ये निवेदन

बीड : झारखंडमध्ये झुंडशाहीचा बळी ठरलेल्या तबरेज अन्सारी याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात शुक्रवारी बीड, आष्टी, गेवराई, केज, परळी आणि धारूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले, तर माजलगाव, अंबाजोगाई, पाटोदा आणि सिरसाळा मोर्चे काढण्यात आले.
अंबाजोगाईत आक्रोश आंदोलन
अंबाजोगाई : अंबाजोगाई व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने शुक्रवारी दुपारी आक्रोश आंदोलन छेडण्यात आले. तसेच मुस्लीम अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची मागणी करण्यात आली. शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना दिले.
तबरेज अन्सारीच्या मारेकºयांना तत्काळ अटक करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तबरेजच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य द्यावे. त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत झुंडबळीला गांभीयार्ने घेत केंद्र शासनाने तत्काळ सक्षम कायदा तयार करावा. पूर्वी झालेल्या झुंडबळीच्या घटनेतील पीडितांना न्याय द्यावा. अशा खटल्यास विशेष सरकारी वकील देऊन जलदगती न्यायालयात ही प्रकरणे निकाली काढावीत] अशा विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आले. या आंदोलनात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
पाटोद्यात धरणे आंदोलन
पाटोदा : पाटोदा येथे मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मुस्लिम समाजाच्या नागरिकांसह सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग नोंदवला.
आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन
सर्वोच्च न्यायालयाने अशा हत्या रोखण्यासाठी कायदा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सरकारने समिती नेमून वेळकाढूपणा केला आहे.
यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले. अन्सारीच्या मारेकºयांवर व त्यांना पाठबळ देणाºया पोलिसांवर कार्यवाही करावी. अन्सारीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात अ‍ॅड. जब्बार पठाण, सय्यद वहाब, सय्यद अब्दुल्ला, शेख जुनेद, सय्यद शाहबाज, सय्यद रियाज, अमीर शेख, शेख इलियास शेख जवाद, सय्यद शाहनवाज, मुन्ना अन्सार, उमर चाऊस, गणेश कवडे, भूषण जाधव आदींसह शेकडो लोकांनी सहभाग नोंदवला.
धारूरमध्ये निवेदन
धारूर : तबरेज अन्सारीच्या हत्यारांना कठोर शिक्षा करावी, देशात आतापर्यंत जेवढे मॉब लिचिंग प्रकरण झाले त्यात लवकरात लवकर शिक्षा द्यावी या मागणीसाठी धारूर येथील मुस्लिम बांधवांनी तहसीलदारच्या मार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सादेक इनामदार, अ‍ॅड. सय्यद साजेद, सय्यद रज्जाक, अफसर पठाण, सादेक बेग, अकरम भाऊ, ताहेरशा, शेख शाहेद, शेख सिद्दीक, मुबीन शेख, अतीक मोमीन, सय्यद फेरोज, लियाकत ताम्बोली, राहील जरगर, ओसमा जरगर, सय्यद मुनीर, सोहेल जरगर,आदिल ताम्बोली, आजीम काजी, सादेक निरखि, जैनुल काझी, शहबाज पठाण, वसिम पठाण, अमजद शा, मोहसिन शा, अरशद पठाण, खिजर पठाण, समीर ताम्बोली, मैहताब पठाण, सय्यद अहमद, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध मागण्या : माजलगावात निवेदन
तबरेज अन्सारीच्या हत्येच्या निषेधार्थ माजलगाव येथील मजलीस ए उलमा व इतेहाद युवा मंचतर्फे शुक्रवारी आंबेडकर चौक ते उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समाजास अ‍ॅट्रासिटी कायदा लागू करावा, झुंडशाहीच्या मारहाणीत बळी गेलेल्यांसाठी सक्षम कायदा करावा, मॉबलिचिंग प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे, वारसांना शासकीय सेवेत घ्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मौलाना महेबूब, मौलाना आयूब, मुफ्ती मुनीवर, मिर्झा अस्लम बेग, शेख इद्रीस पाशा, अखिल पटेल, शेख आसेफ, राजू खुरेशी, शेख आसद, तौफीक शेख आदीने परिश्रम घेतले.

Web Title: Inhibition of bunch in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.