मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला; कार उलटून तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

By सोमनाथ खताळ | Updated: June 23, 2023 07:59 IST2023-06-23T07:58:48+5:302023-06-23T07:59:16+5:30

या भीषण अपघातातील मृत आणि जखमी नेवासा येथील रहिवासी आहेत

In Beed Tragic accident when going to a friend's wedding; Three died on the spot, one was injured after the car overturned | मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला; कार उलटून तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला; कार उलटून तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

बीड : तालुक्यातील पेंडगावजवळ चालकाचे नियत्रंण सुटून कारचा भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली. यात नेवासा (अहमदनगर) येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. 

नेवासा येथून मित्राच्या लग्नाला बीडकडे येत असताना पेंडगाव जवळ चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे काही कळायच्या आत तीन ते चार वेळा पलट्या घेत कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात ऐवढा भीषण होता की यात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व बीड ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

धीरज गुणदेजा (वय 30), रोहन वाल्हेकर (वय 32), विवेक कांगुने (वय 33) अशी मृतांची नावे आहेत. तर आनंद वाघ (वय 28) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी आहेत. 

Web Title: In Beed Tragic accident when going to a friend's wedding; Three died on the spot, one was injured after the car overturned