शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

बीडपर्यंत रेल्वेमार्ग तयार; आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:01 IST

मराठवाड्यासाठी महत्वाचे! धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू?

बीड : अहिल्यानगर-बीडपर्यंतरेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाची केंद्र शासनस्तरावरून पडताळणी हाेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदरील रेल्वे कामासाठी ४,८५७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा मार्ग २४० किमी आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालय कधी निर्णय घेईल याकडे लक्ष लागले आहे.

सोलापूर-जळगाव या रेल्वेलाइनसाठी तुळजापूर, उस्मानाबाद, बीड, गेवराई, पैठण, घृणेश्वर, सिल्लोड व अजिंठा या मार्गाचा सर्व्हे केला जाईल, असे २००८-०९ मध्ये जाहीर करण्यात आले होते; परंतु पुढे हे सर्व्हे काम पूर्ण झाले नव्हते. त्यानंतर २०१७ मध्ये मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने सदरील सर्व्हे तत्काळ करावा, अशी मागणी केली होती. हा मार्ग बदलण्यात येत असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात तेव्हा करण्यात आला होता. त्यानंतर रेल्वेकडून दोन भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. पहिल्या भागात उस्मानाबाद-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन लाइन प्रोजेक्ट आरईसीटी सर्व्हे २०१८-१९ मध्ये मंजूर करून त्यानुसार २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला सर्व्हेक्षण रिपोर्ट पाठिवला होता. तर दुसऱ्या भागात सोलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापूर या रेल्वे लाईनचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते.

तर बीडचा होणार औद्यागिक विकासबीडमध्ये इंडस्ट्रिअल एरिया नाही म्हणून विकास खुंटलेला आहे. परंतु आता अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यात रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण होईल असे अपेक्षित आहे. हे पूर्ण झाल्यानंतर इतर एक्सप्रेस रेल्वे बीडशी जोडल्या जातील. रेल्वे बीडमध्ये येणार असल्याने मालवाहतुक सोपी होईल. त्यातच आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजी नगर रेल्वे मार्गाचा सर्व्हे आधीच पूर्ण झाला आहे. त्यामुळे हा मार्ग झाला तर बीड शहर हे रेल्वेसाठी मध्यवर्ती ठिकाणी होईल. वाहतूक सुविधा निर्माण झाल्यास मोठ्या कंपन्या बीडमध्ये येतील परिणामी बीडचा विकास झपाट्याने होईल असे अपेक्षित आहे.

वाहतुकीवर खुप काही निर्भरट्रक किंवा इतर वाहनांच्या मदतीने इतर जिल्ह्यातील किरणा, लोखंड, स्टील, खते यासह इतर माल बीडमध्ये पोहोचतो. वाहनाद्वारे होणारे वाहतुक खर्चिक असते. परंतु रेल्वेद्वारे माल वाहतूक कमी खर्चिक असते. शिवाय कमी वेळेत देशभरात इतर ठिकाणी माल आणला-नेला जाऊ शकतो. वाहतुकीवर खुप काही निर्भर त्यामुळे वाहतूक दर कमी असल्यास माल ने-आण करण्यास आर्थिक झळ बसत नाही. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होईल.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडMarathwadaमराठवाडा