शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

बीड : लग्नसमारंभ, मेळावे, राजकीय सभांच्या वेळी अनेक ठिकाणी ड्रोन उडवण्याचा ट्रेंड आला आहे. प्री वेडिंग किंवा वेडिंग ...

बीड : लग्नसमारंभ, मेळावे, राजकीय सभांच्या वेळी अनेक ठिकाणी ड्रोन उडवण्याचा ट्रेंड आला आहे. प्री वेडिंग किंवा वेडिंग शूटिंग ड्रोनद्वारे करायची असेल, तर परवानगी असलेला ड्रोनच हवा. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. अन्यथा कारवाई होऊ शकते. नवीन ड्रोन अद्यावत असले तरी आपण ते काळजीपूर्वक उडविणे महत्त्वाचे आहे. बीड शहरातही हौशी तसेच व्यावसायिक फोटोग्राफर फोटोग्राफीसाठी ड्रोनचा वापर करतात. नवीन आलेल्या ड्रोनमध्ये सेन्सर सिस्टिम आहे. त्यामुळे धडकण्याचा प्रकार होत नाही. ड्रोन जागेवरच थांबते. तसेच इमेज फॉलो सिस्टीमही आली आहे. वाहनाची किंवा व्यक्तीची शूटिंग करताना ड्रोन ऑटोमॅटिक फॉलो करते. त्यामुळे हे नवीन ऑप्शन फार चांगले आहे. आपण आपल्या ड्रोनद्वारे अनेक चांगले दृश्य टिपू शकतो. व्हिडिओ क्षेत्रात ड्रोन आल्यामुळे क्रांतीच झाली असली तरी ते वापरताना नियमांचे भान ठेवणे गरजेचे आहे.

----------

ड्रोन वापरण्याचेही नियम

ड्रोन अधिकाधिक लोकप्रिय होत असले तरी उड्डाण करणे हे बऱ्याच जबाबदाऱ्यांशी संबंधित आहे. ड्रोनसाठी लागू असलेले नियम जाणून घेणे आणि त्यास व्यवहारात लागू करण्याचे कायदेशीर बंधन आहे.

----------

बेकायदेशीरपणे उड्डाण करताना दंड होण्याचे किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते. निष्काळजी उड्डाणांमुळे होणाऱ्या नुकसानीस ड्रोन ऑपरेटर जबाबदार ठरू शकतो.

-----------

हवाई वाहतूक सुरक्षेच्या हितासाठी आणि शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी बंधने पाळणे आवश्यक आहेत. विमानतळ, रेल्वे, प्रतिबंधित क्षेत्र, संवेदनशील भागात ड्रोन उडविण्यावर प्रतिबंध आहे. तसेच या भागात ड्रोनचे जीपीएस लॉक होते.

----------

ज्या भागात चित्रीकरण केले जाणार आहे, त्या भागातील संबंधित पोलीस ठाणे, हॉटेल, रिसोर्ट, मंगल कार्यालयांकडून रितसर विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे. मोठ्या शहरातील हॉटेलमध्ये विशिष्ट नमुन्यातील अर्ज भरून घेतला जातो.

----------

ड्रोनची वेगमर्यादा व उंची ही मर्यादित ठेवावी आपल्या ड्रोनचे शासन नियमानुसार ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे. शक्यतो संवेदनशील जागेत ड्रोन उडवताना संबंधित पोलीस स्टेशनमधून डीवायएसपी कार्यालयातून परवानगी घ्यावी. - महेश तिवारी, बीड.------------

ड्रोन उडवण्यासाठी लायसन हवे!

दीड वर्षापूर्वी पोलीस उपअधीक्षक कार्यालयात ड्रोन व्यावसायिकांना बोलावून त्यांची ऑनलाईन नोंदणी करून माहिती भरून घेतली होती. यात ड्रोन मॉडेल, क्षमता, आकार, मालकाचे तसेच ऑपरेटरचे नाव आदी उल्लेख असणारी माहिती नोंदवून शासन निर्देशित संकेतस्थळावर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र आता नवीन ड्रोन घेणाऱ्यांना शासकीय नियमांचे सोपस्कर आधी पूर्ण करावे लागतात.

परवानगी सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची

ड्रोनची वेगमर्यादा व उंची ही मर्यादित ठेवावी आपल्या ड्रोनचे शासन नियमानुसार ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे. शक्यतो संवेदनशील जागेत ड्रोन उडवताना संबंधित पोलीस स्टेशनमधून डीवायएसपी कार्यालयातून परवानगी घ्यावी. शासन आणि आपल्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ही परवानगी घेतली पाहिजे. - महेश तिवारी, छायाचित्रकार, बीड.

शुटिंगचा खर्च कौशल्यावर

लग्नसमारंभ, किंवा प्रिवेडिंग शूटिंग किंवा राजकीय अथवा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात ड्रोनद्वारे छायाचित्रणाची मागणी अलीकडच्या काळात वाढलेली आहे. दृश्य, प्रसंग व ऑर्डरनुसार शूटिंगचे दर मिनिटानुसार अथवा एकूण कालावधीनुसार ठरतात. ३० मिनिटांसाठी साधारणत: ५ ते ७ हजार रुपये दर आकारले जातात. तर अनेक व्यावसायिक त्यांच्या कामाची गुणवत्ता, कौशल्याच्या बळावर शूटिंगचे दर ठरवतात, असे छायाचित्रकार राजू शिंदे यांनी सांगितले.

---------