शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

...तर अधिक आनंद झाला असता; बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांना गेल्यानंतर पंकजा मुंडेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:14 IST

मी बीडची लेक असल्याने बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

BJP Pankaja Munde: मंत्रिमंडळ विस्ताराच्या महिनाभरानंतर अखेर राज्यात पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र पालकमंत्रिपदाबाबतच्या निर्णयानंतर महायुतीत धुसपूस वाढीस लागली असून काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं सांगितलं असलं तरी आपल्या मनातील खंतही बोलून दाखवली आहे. मी बीडची लेक असल्याने बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता, असं त्यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मला जालन्याचं पालकमंत्रिपद मिळालं आहे. प्रचंड प्रतिसाद मला तिथून येत आहे. मला एखादी संधी मिळते तेव्हा मी एक अनुभव म्हणून त्याकडे पाहत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं, असं नाही. जसं मी ५ वर्षे कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना संघटनेचं काम केलं. मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करण्यासाठी संधी मिळाली असती तर अधिक आनंद झाला असता, बीडकरांनाही आनंद झाला असता," अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, " माझा पाच वर्षांचा पालकमंत्रिपदाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सर्वांत विकसनशील काळ होता, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता पालकमंत्रिपदाबाबत जो निर्णय झाला आहे, त्याबाबत असहमती न दर्शवता जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहे," असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

धनंजय मुंडेंना धक्का मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापले. या हत्येचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर असल्यामुळे, विरोधक सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तसेच, बीडमधील मराठा समाजाचाही धनंजय मुंडेंच्या नावाला विरोध होता. अशा परिस्थितीमध्ये मुंडेंना बीडचे पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अखेर यादी आली अन् त्यातून मुंडेंचे नाव वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे, धनंजय मुंडेंना फक्त बीडच नाही, तर कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले नाही.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडBJPभाजपाMahayutiमहायुती