शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू’ असे म्हणत डॉक्टर विद्यार्थिनीचा धरला हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 19:19 IST

पाच महिन्यांपासून छेडछाड सुरू असताना शिक्षण बंद होण्याच्या भीतीने केली नव्हती तक्रार

बीड : काय चाललय, कशी आहेस. तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू... असे म्हणत एका डॉक्टर विद्यार्थिनीचा वर्गमित्रानेच हात धरला. त्यानंतर तिला टाँट मारल्याचा प्रकार बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. याप्रकरणी तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बीड शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात २२ वर्षीय तरूणी शिक्षण घेत आहे. मागील तीन वर्षापासून ती बीडमध्ये राहते. सध्या महाविद्यालयाला सुट्टया आहेत. तसेच ती महाविद्यायलाच्या वसतिगृहातच वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी ती नाश्ता करण्यासाठी जवळीलच एका हॉटेलात गेली होती. याचवेळी तेथे विलास राठोड, तानाजी सखनूर व अनिकेत सागळे हे आले. त्यांनी तरूणीला पाहून टाँट मारले. परंतु तीने याकडे दुर्लक्ष केले. हॉटेलमधून बाहेर पडतानाच विलासने तिला आडवले. ‘काय चाललय, कशी आहेस. तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू...’ असे म्हणत तिचा हात पकडला. यावर तीने आपण प्राचार्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. यावर त्यांनीही तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. 

तेथून कशीबशी सुटका करून पीडिता वसतीगृहात आली आपल्या मामेभावाला हा प्रकार सांगितला. त्यांनी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार कथन केला. त्याप्रमाणे तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पैकी विलास व तानाजी यांना पोलिसांनी अटक केली असून अनिकेत हा अद्यापही फरार असल्याचे पोली सूत्रांनी सांगितले.

पाच महिन्यांपासून छेडछाड सुरूचसदरील तिनही तरूण हे या डॉक्टर तरुणीची मागील चार ते पाच महिन्यांपासून छेड काढत होेते. वर्गात बसल्यावरही टाँट मारत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आपले शिक्षण बंद होईल, उगाच अडचण नको, म्हणून सदरील पीडितेने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. सोमवारी त्यांनी जास्तच केल्याने पीडितेने ठाणे गाठून फिर्याद दिली. केवळ भितीपोटी आपण शांत बसल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणBeedबीड