Video: '...तर मला पंतप्रधान मोदीही संपवू शकणार नाही'; पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 16:31 IST2022-09-27T16:30:54+5:302022-09-27T16:31:11+5:30
बीडमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी संवाद साधला.

Video: '...तर मला पंतप्रधान मोदीही संपवू शकणार नाही'; पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले. समाजातील "बुद्धिजिवी लोकां सोबत संवाद" या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांची विशेष उपस्थिती होती.
पंतप्रधान @narendramodi जी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई येथे सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत संवाद बुद्धिवंतांशी या कार्यक्रमास उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला व उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी खा.@DrPritamMunde, आ.@NamitaMundada आदि उपस्थित होते.#सेवा_पखवाड़ाpic.twitter.com/jSUmb0f8v2
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 26, 2022
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणीही संपवू शकतं नाही. मी जर लोकांच्या मनामध्ये राज्य केलं तर नरेंद्र मोदी देखील मला संपवू शकणार नाही, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बीड- मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणीही संपवू शकतं नाही- भाजपा नेत्या पंकजा मुंडे pic.twitter.com/2ifw7q028n
— Lokmat (@lokmat) September 27, 2022