दुचाकी अपघातात पती ठार; पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:31 IST2019-09-24T00:31:09+5:302019-09-24T00:31:26+5:30

पत्नीसोबत सासुरवाडीकडे जाताना दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा (ता. अंबड) येथे घडली.

Husband killed in bike accident; The wife was injured | दुचाकी अपघातात पती ठार; पत्नी जखमी

दुचाकी अपघातात पती ठार; पत्नी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : पत्नीसोबत सासुरवाडीकडे जाताना दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा (ता. अंबड) येथे घडली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात कार चालक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती फरार झाली आहे.
गोरख विठ्ठल नागरे (५४, रा. संगम जळगाव ता. गेवराई) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सोमवारी सकाळी ते सासुरवाडी दोदडगावकडे पत्नी नयना नागरे ( वय ५०) यांच्यासोबत दुचाकीवरुन जात होते. दरम्यान धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाट्यावर बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार गोरख नागरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती तर पत्नी नयना नागरे या जखमी झाल्या. अपघातानंतर परिसरातील बळीराम मुंडे, बाळासाहेब नागरे, वामन गिते, शेख नूरसह अन्य तरु णांनी त्यांना तात्काळ पाचोड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथे जाताना अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात कार चालक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिला चालक फरार झाली आहे. मयतावर गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार
आहे.

Web Title: Husband killed in bike accident; The wife was injured