पहिल्याच दिवशी कॉपी पुरविणारे प्रशासनाच्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद; बीड जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:32 IST2026-02-11T15:31:42+5:302026-02-11T15:32:31+5:30

जिल्हास्तरावर नियुक्त भरारी पथकांनी विविध तालुक्यांतील परीक्षा केंद्रांना भेटी देत पाहणी केली.

HSC Exam: Those providing copies on the first day were caught on the administration's drone camera; This is the case in Beed district | पहिल्याच दिवशी कॉपी पुरविणारे प्रशासनाच्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद; बीड जिल्ह्यातील प्रकार

पहिल्याच दिवशी कॉपी पुरविणारे प्रशासनाच्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद; बीड जिल्ह्यातील प्रकार

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरलाच चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालय या केंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेतून काही लोक कॉपी पुरवितानाचे चित्र ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेत संबंधित केंद्र संचालकांकडून खुलासा मागविला आहे.

जिल्ह्यातील १०३ परीक्षा केंद्रांवर मंगळवारी बारावी परीक्षा सुरळीत सुरू झाल्या. परीक्षा वेळेच्या अर्धा तास आधी विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग केले. यंदा परीक्षा केंद्रातील सर्व वर्गखोल्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले होते. कंट्रोल रूम स्थापित करून परीक्षा केंद्रांवरही नजर ठेवण्यात येत होती. संवेदनशील केंद्र तसेच परीक्षा केंद्रांवर बाहेरची बाजू नियंत्रित करण्याच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था केली होती. तसेच संवेदनशील केंद्रांवरील स्टाफ बदलण्यात आला होता.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातील बलभीम महाविद्यालय, मिल्लीया कॉलेज, चंपावती विद्यालय, बंकटस्वामी महाविद्यालय व इतर केंद्रांना भेटी देऊन तेथील परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत का? याची खातरजमा करून परीक्षा केंद्रांतील सुविधांबाबत सूचना केल्या.

गर्दी हटविण्यासाठी दंडुक्याचा धाक
शहरातील बलभीम महाविद्यालयाच्या मागील बाजूने भिंतींवर चढून कॉपी पुरविण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तेथील मुलांना दंडुक्याचा धाक दाखवत हुसकावून लावले. मिल्लीया कॉलेज केंद्राच्या परिसरात गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना वेळोवेळी सूचना कराव्या लागल्या. केएसके कॉलेज केंद्राच्या बाहेर काही तरुणांची गर्दी दिसली. परंतु, गेट बंद असल्याने कॉपी पुरविण्याचा प्लान फसला. शहरी भागातील केंद्रात परीक्षा सुरळीत पार पडली असली तरी ग्रामीण भागात अनेक केंद्रांवर कॉपी पुरविण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील होते.

चौसाळ्यातील प्रकार
चौसाळा येथील कला, विज्ञान केंद्राच्या मागील बाजूस काही लोक कॉपी पुरवितानाचे चित्र ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर संबंधित केंद्र संचालकांकडून प्रशासन व शिक्षण विभागाने याबाबत खुलासा मागविला आहे. परीक्षेनंतर त्यांना बीडमध्ये बोलावले होते. ‘लोकमत’ने केंद्र संचालक संजय घाडगे यांना संपर्क केला असता बाहेर उपद्रवी असतील; परंतु, परीक्षा केंद्रातील कक्षात कॉपीचा गैरप्रकार घडला नसल्याचे सांगून अधिक भाष्य करण्याचे टाळले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर या प्रकरणी केंद्र प्रमुख आणि संबंधित सर्व यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

भरारी पथकांच्या भेटी
जिल्हास्तरावर नियुक्त भरारी पथकांनी विविध तालुक्यांतील परीक्षा केंद्रांना भेटी देत पाहणी केली. शिक्षणाधिकारी (मा.) प्रियाराणी पाटील, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. किरण कुंवर, डायटचे प्राचार्य डॉ. अनिल मुरकुटे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद सोनटक्के, विपुल भागवत, अंजूम सय्यद यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची पथके होती.

Web Title : बीड में ड्रोन से नकल कराने वाले पहले ही दिन पकड़े गए!

Web Summary : बीड जिले में 12वीं की परीक्षा में ड्रोन से नकल कराने वाले पकड़े गए। चौसाला कॉलेज की जांच शुरू, सीसीटीवी और उड़न दस्तों से निगरानी बढ़ाई गई।

Web Title : Copying on first day caught by drone in Beed!

Web Summary : Beed district caught people providing answers during 12th-grade exams via drone. Authorities investigate Chausala college after the incident came to light. Vigilance was heightened with CCTV, control rooms, and flying squads.