शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

९० हजार कोटी रुपयांचे घोटाळे करून मुख्यमंत्री महाजनादेश मागणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:34 IST

भाजप-सेनेच्या सोळा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची २२ प्रकरणे प्रलंबित आहेत. या मंत्र्यांनी ९० हजार कोटींचे घोटाळे केले आहेत. हा एवढा भ्रष्टाचार समोर असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महाजनादेश मागणार? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देअमोल कोल्हे । अंबाजोगाईत शिवस्वराज्य यात्रेनिमित्त निघाली मोटारसायकल रॅली

अंबाजोगाई / माजलगाव : भाजप-सेनेच्या सोळा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची २२ प्रकरणे प्रलंबित आहेत. या मंत्र्यांनी ९० हजार कोटींचे घोटाळे केले आहेत. हा एवढा भ्रष्टाचार समोर असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महाजनादेश मागणार? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निघालेली शिवस्वराज्य यात्रा शनिवारी सकाळी अंबाजोगाईत पोहचली. अंबाजोगाई शहरातून निघालेल्या भव्य मोटारसायकल रॅलीनंतर मोंढा मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खा. डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, नंदकिशोर मुंदडा, नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.डॉ. कोल्हे म्हणाले की, फडणवीस सरकार पूर्ण पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारने सामान्य जनतेच्या अपेक्षांचा कडेलोट केलाय. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात सोळा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. राज्यात मुख्यमंत्र्यांचं गाव नागपूर हे क्राईम कॅपिटल झालंय. गेल्या पाच वर्षात राज्यात एक लाख २५ हजार महिलांवर अत्याचार झाले. १६ हजार ५०० महिलांवर बलात्कार झाले. ३७ हजार महिलाचा विनयभंग झाला. अशी स्थिती असतांना कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. असं कसं म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित केला.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भाजप सरकारने राज्यात किळसवाणे राजकारण सुरू केले आहे. विरोधकांना ईडी, न्यायालय, सीबीआयच्या धमक्या दाखवून पक्षांतर करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. ज्यांनी सत्ता भोगली, पदे भोगली ते आता पक्ष सोडून जात आहेत. परंतु अशा गयाराम लोकांमुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही, असे ते म्हणाले.यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, एअर स्ट्राईकमध्ये लोकसभा घालविली आता पुन्हा ३७० कलमामध्ये विधानसभा घालवू नका. नाही तर आपलं पुन्हा वाटोळं होईल. भाजपा-सेना हा फसव्यांचा पक्ष आहे. केवळ थापा मारून त्यांनी पाच वर्षे घालविली. कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. दुष्काळात शेतकऱ्यांना वाºयावर सोडले. अशा या थापाड्या सरकारला सत्तेपासून खाली खेचा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बोलतांना नमिता मुंदडा म्हणाल्या की, केज विधानसभा मतदारसंघ व मुंदडा परिवार यांचे कौटुंबिक नाते आहे. हे नाते जोपासून मतदारसंघाला न्याय देण्यासाठी मी विमलताईंचा वारसा खंबीरपणे जोपासेल. त्यांचे अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे अधुरे राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. यावेळी बोलतांना अक्षय मुंदडा म्हणाले की, कसलेही पद नसतांना गेल्या सात वर्षांपासून जनतेच्या आशीवार्दामुळे व प्रेमामुळे आम्ही राजकारणात टिकून आहोत. विमलताई मुंदडा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जे स्थान निर्माण केले. त्याचा मोठा फायदा केज मतदारसंघाच्या विकासासाठी झाला. जिल्हा निर्मितीसाठी लागणारी सर्व कार्यालये आज अंबाजोगाईत आहेत. मात्र, केज विधानसभा मतदारसंघ हा गेल्या पाच वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. याच इमारतींना रंग देऊन उद्घाटने करण्याचा खटाटोप सुरू आहे. आमदारांनी दुष्काळासंदर्भात एकही बैठक घेतली नाही. अथवा दुष्काळात होरपळणाºया शेतकºयांसाठी चाराछावण्या सुरू केल्या नाहीत, असे विविध आरोप अक्षय मुंदडा यांनी यावेळी केले.वृक्षारोपणाची चळवळ गतिमान करण्यासाठी नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघात ५ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करून सभेसाठी आलेल्या कार्यकर्ते व शेतकरी यांना ५ हजार वृक्षांचे वाटप केले. शिवस्वराज्य यात्रा अंबाजोगाई शहरात सकाळी १० वाजता दाखल झाली. या मोटारसायकल रॅलीत २ हजारांपेक्षा जास्त मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते.माजलगावात स्वागतशिवस्वराज्य यात्रेचे माजलगाव शहरात शुक्र वारी दुपारी ४ वाजता आगमन झाले. परभणी चौफाळा येथून दुचाकी रॅलीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर मोंढा मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. डॉ.अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, अमोल मिठकरी, माजी मंत्री प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अमरसिंह पंडित, अशोक डक, जयसिंह सोळंके, रमेश सोळंके, शेख मंजुर आदी उपस्थित होते.पार्सल परळीला पाठविणारमाजी मंत्री प्रकाश सोळंके म्हणाले की, माजलगाव मतदार संघातील जनतेला गोडबोलून आलेले परळीचे पार्सल जनता वापस पाठवणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव नॉटरिचेबल आमदार म्हणून आ.आर.टी.देशमुखांनी ख्याती मिळवली. भाजपाकडून आपल्यालाच उमेदवारी म्हणत गावोगावी देशमुख-आडसकर-जगताप हे नाचत फिरत आहेत. आता उपºयांना उमेदवारी मिळणार नसून भाजपाकडून ओमप्रकाश शेटेच उमेदवार असल्याचे प्रकाश सोळंके म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ही भाषण झाले. सूत्रसंचालन कचरु खळगे, आभार प्रदर्शन बाजार समिती सभापती अशोक डक यांनी मानले.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार