शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश्य आवाजाचे हॉर्न, सायलेन्सरचा त्रास कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:51 IST

बीड : सायलेन्सरला फोडून फटाक्यासारखे आवाज काढत वाहन चालवण्याची क्रेझ तरुणांमध्ये रुढ झाली आहे. मोठा आवाज करीत वाहन चालविणे ...

बीड : सायलेन्सरला फोडून फटाक्यासारखे आवाज काढत वाहन चालवण्याची क्रेझ तरुणांमध्ये रुढ झाली आहे. मोठा आवाज करीत वाहन चालविणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याने वाहतूक शाखेने याविरुद्ध कारवाई केल्यानंतरही त्यास लगाम बसत नसल्याची स्थिती जिल्ह्यात आहे.

शहरी भागात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच कर्णकर्कश्य हॉर्न गाडीला बसवून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये छेडछाड करुन फटाके वाजल्याचा आवाज काढत वाहने चालविली जातात. शहरी भागात हा प्रकार अधिक आहे. वाहतूक शाखेने याविरुद्ध कारवाया देखील केल्ल्या आहेत. मात्र, तरी देखील हा आवाज कमी होताना दिसत नाही. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह सहन करावा लागतो, वाहतूक शाखेने याविरुद्ध वर्षभरात अनेक वेळा दंडात्मक कारवाई केली. मात्र, कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

वर्षभरात २०० जणांवर पोलिसांकडून कारवाई

मागील वर्षभरात शहरातील वाहतूक शाखेने मोठा आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्या १८५ तर, कर्णर्कश्य हॉर्न वाजवणाऱ्यां १५ जणांवर कारवाया केल्या आहेत. यावेळी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेतून देण्यात आली. याशिवाय नियम मोडणाऱ्या वाहनांवरही कारवाई झालेली आहे.

दंड करुन सायलेन्सर जप्त

सायलेन्सरचा आवाज मोठा असेल तर त्या वाहनधारकाला दंड आकारला जातो. त्याचप्रमाणे सायलेन्सर जप्त करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात अशा पद्धतीच्या कारवाई मागील वर्षात केल्या आहेत. मोठ्या आवाजाच्या हॉर्नच्या संदर्भातही अशाच पद्धतीने कारवाई करण्याची तरतूद आहे.

मोठ्या आवाजाच्या हॉर्नवर कारवाई वाढवणे गरजेचे

सायलेन्सरच्या आवाजाबरोबरच काही वाहनांना चित्र-विचित्र हॉर्न बसविलेले असतात. या हॉर्नमुळे अनेक वेळा समोरचा व्यक्ती घाबरतो किंवा दचकतो. याशिवाय मोठ्याने हॉर्न वाजवित शहरातील रस्त्यांवरुन धावणाऱ्या वाहनांची संख्याही अधिक आहे. अशा वाहनांवर सहसा कारवाई कमी प्रमाणात होत आहेत.. त्यामुळे हे प्रकार वाढत चालले आहेत. शहरातील अरुंद रस्ते, वाढलेली वाहने आणि त्यात नियम डावलत वाहने चालविल्याने त्याचा त्रास इतर वाहनधारकांना सहन करावा लागतो. त्यामुळे कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

सायलेन्सरचे आवाज करीत फिरणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे दिवसभर माईकद्वारे आवाहन करीत वाहनचालकांना नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन देखील केले जात आहे. सायलेन्सर, मोठ्या आवाजाचे हॉर्न वापरण्यास पोलिसांकडून ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच विद्यार्थी असेल तर, पालकांना याची माहिती दिली जाते

कैलास भराती सपोनि

दंड करुन सायलेन्सर जप्त

सायलेन्सरचा आवाज मोठा असेल तर त्या वाहनधारकाला दंड आकारला जातो. त्याचप्रमाणे सायलेन्सर जप्त करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात अशा पद्धतीच्या कारवाई मागील वर्षात केल्या आहेत. मोठ्या आवाजाच्या हॉर्नच्या संदर्भातही अशाच पद्धतीने कारवाई करण्याची तरतूद आहे.