टेम्पो 'रिव्हर्स' घेताना हमालाचा चिरडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 13:45 IST2019-12-23T13:44:29+5:302019-12-23T13:45:48+5:30

वजन काट्याजवळ झाला मृत्यू

Hamala's crushing death while taking the tempo 'reverse' in Kada | टेम्पो 'रिव्हर्स' घेताना हमालाचा चिरडून मृत्यू

टेम्पो 'रिव्हर्स' घेताना हमालाचा चिरडून मृत्यू

कडा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाने भरलेला टेम्पो वजन करून पाठीमागे येत असताना त्याखाली एक हमाल चिरडल्याची घटना सोमवारी (दि. २३ ) सकाळी ९ वाजे दरम्यान घडली. दादासाहेब पंढरीनाथ भिताडे (४० ) असे मृत हमालाचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बी. के. पोखरणा यांच्या आडतीवर दादासाहेब भिताडे हे हमालीचे काम करत असत. सोमवारी आडतीवर एक टेम्पो कापूस घेऊन आला होता. त्याचे वजन करण्यासाठी भिताडे टेम्पोसोबत वजनकाट्यावर आले. वजनाची पावती घेऊन भिताडे आडतीकडे परत निघाले असता चालकाने वेगाने टेम्पो मागे घेतला. यावेळी मागे चालत जाणारे भिताडे चालकाला न दिसल्याने टेम्पोखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व एक मुल असा परिवार आहे. या अपघात प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अद्याप कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान, टेम्पो चालक फरार झाला आहे.

Web Title: Hamala's crushing death while taking the tempo 'reverse' in Kada