शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गुरू-शिष्याचा भावुक क्षण, धनंजयच्या हातात माईक अन् वाघमारे गुरुजींचं भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 9:01 PM

परळीत रविवारी 10 फेब्रुवारी रोजी गुरुजींचा 'गौरव सोहळा' आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रत्यक्ष हजेरी लावली.

 बीड - विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा एक फोटो परळीकरांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्या फोटोत, परळी नगरीचे भूषण व मराठी साहित्यात ज्यांचं आदरानं नाव घेतले जातं ते आबासाहेब वाघमारे गुरुजींच्या भाषणावेळी धनंजय मुडेंनी चक्क त्यांचं भाषण सुरू असताना माईक हातात पकडल्याचं दिसत आहेत. आबासाहेब वाघमारे गुरुजींच्या 'अमृत महोत्सवी वर्षा'निमित्त आयोजित कार्यक्रमातील हा फोटो आहे. 

परळीत रविवारी 10 फेब्रुवारी रोजी गुरुजींचा 'गौरव सोहळा' आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रत्यक्ष हजेरी लावली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर येथे सायंकाळी 6 वाजता हा गौरवसोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंसह धनंजय मुडेंनीही भाषण केलं. मात्र, भाषणानंतर पंकजा मुंडे लगेच निघून गेल्या, तर धनंजय मुंडे गुरुजींचं भाषण होईपर्यंत तेथे उपस्थित होते. विशेष म्हणजे गुरूजींच्या भाषणावेळी धनंजय मुंडेंनी चक्क स्वत:च्या हातात माईक धरला. गुरुजी बोलत होते आणि धनंजय मुंडेंच्या हातातील माईकमुळे तो आवाज समोर उपस्थित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होता. मुडेंच्या या कृतींची अनेकांनी वाहवा केल्याचंही पाहायला मिळालं.

मी जरी गुरुजींचा विद्यार्थी नसलो, तर महाराष्ट्रात फिरत असताना, गुरुजींचे विद्यार्थी मला नेहमीच भेटतात. त्यावेळी, एक परळीकर म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो. गुरुजींचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्य करतात. मी गुरुजींचा शाळेतील विद्यार्थी जरी नसलो, तरी त्यांच्या विचारांची पूजा करणारा या परळीतचा मुलगा आहे. त्यामुळे मीही गुरुजींचा विद्यार्थी असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं. त्यावेळी परळीकरांनी टाळ्या वाजवून त्यांच्या भाषणाला दाद दिली. दरम्यान, या सोहळ्याला ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे, राज्याच्या विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक फ.म. शहाजिंदे, नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 

कोण आहेत आबासाहेब वाघमारे गुरूजी परळी शहरातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून साहित्य क्षेत्रात आबासाहेब वाघमारे यांची ओळख आहे. आबासाहेब वाघमारे यांचे साहित्य क्षेत्रात प्रचंड योगदान आहे. मराठी साहित्यात त्यांच्या समृद्ध साहित्याने मोठी भर घातली आहे. कथासंग्रह, काव्यसंग्रह, प्रौढ शिक्षण अभ्यासक्रम पुस्तिका, कथा, दीर्घकथा, नाटिका, हस्तपुस्तिका,आदी  मराठीसह उर्दू भाषेतही प्रकाशित आहेत. विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब वाघमारे यांनी जीवनभर अविरत काम केले आहे. प्रति साने गुरुजी अशीच जणू त्यांची ओळख निर्माण झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी व विविध माध्यमातून सक्रिय काम करून एक उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक अशी त्यांची प्रतिमा आहे. नवोदित साहित्यिकांचे एक प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांनी काम केले आहे. आकाशवाणी, प्रौढ शिक्षण,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बाल वाचक लेखक मेळावा, परिसंवाद, नवथर  साहित्य मंडळ , नाट्य चळवळ, वाचन चळवळ, अनिसं चळवळ  आदी माध्यमातूनही त्यांनी साहित्यिक व वैज्ञानिक  अभिरुची निर्माण करण्याचे काम सक्रियपणे केलेले आहे. सदोदित प्रेमळ, कार्यप्रेरक, प्रेरणास्त्रोत व निस्पृह साहित्यिक अशा विविध पैलूंनी नटलेल्या बाबासाहेब वाघमारे यांचे हे व्यक्तिमत्त्व परळीकरांसाठी भूषण आहेत. या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वासाठी त्यांच्या जीवनातील हजारो सहकारी, विद्यार्थ्यांनी सोहळ्याचे साक्षीदार होऊन स्वतः धन्य झाल्याचे म्हटले. 

धनंजय मुंडेंचे वाघमारे गुरुजींच्या सन्मानार्थ शब्द परळीचे गुरुवर्य, बाल साहित्यिक आबासाहेब वाघमारे गुरुजींचा अमृत महोत्सव सोहळा रविवारी परळीत संपन्न झाला. गुरुजींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. वाघमारे गुरुजी हे मूल्यसंस्काराचे विद्यापीठ आहे. परळीचे साने गुरुजी आहेत. आर. के. लक्ष्मण यांचे कॉमन मॅन आहेत. त्यांच्या हातून एक संवेदनशील पिढी निर्माण झाली.

कार्यक्रमादरम्यान गुरूजींचा गौरव ग्रंथ 'सृजनामृत', पुस्तक 'रुजवण' या मूल्य विचार संग्रहाचे प्रकाशन केले. मला अत्यंत आनंद होतोय की, गुरुजींची सर्व ग्रंथसंपदा आता 'ब्लॉग'वर उपलब्ध होणार आहे. त्यांच्या विचारांचा प्रवाह असाच वाहत राहणार आहे.

सर्व मान्यवरांनी वाघमारे गुरुजींच्या कार्याची दखल घेतली. वैद्यनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुजींची शिकवण, त्यांची शिस्त अशा विविध आठवणी सांगितल्या. परदेशात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने व्हिडोओद्वारे सरांविषयी आपले मनोगत मांडले. या नेत्रदीपक सोहळ्यास सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रा. फ. म. शहाजिंदे, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे मंचावर उपस्थित होते. हा गौरव सोहळा साहित्यिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या सर्व रसिकांना एक आगळीवेगळी पर्वणी ठरला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड