आचार, विचार, आहार शुद्ध ठेवल्यास आरोग्य सुदृढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST2021-03-28T04:31:17+5:302021-03-28T04:31:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केज : युसूफवडगाव पोलीस ठाणे व आयुर्वेल लाईफ केअर, मुंबई व संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, अंबाजोगाई ...

आचार, विचार, आहार शुद्ध ठेवल्यास आरोग्य सुदृढ
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : युसूफवडगाव पोलीस ठाणे व आयुर्वेल लाईफ केअर, मुंबई व संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, अंबाजोगाई अंतर्गत आधार माणुसकीचा उपक्रमाच्या पुढाकाराने पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.
यावेळी स. पोलीस निरीक्षक दहिफळे म्हणाले, सध्याच्या काळात उत्तम आरोग्य हीच खरी माणसाची धनसंपदा आहे. प्रत्येक माणसाने आपले आचार-विचार-आहार शुद्ध ठेवल्यास निश्चितच प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहू शकते. प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. कामाच्या तणावामुळे व वयोमानानुसार शरिरात वेगवेगळ्या आरोग्य समस्या निर्माण होत असल्याने त्याची पूर्वकल्पना मिळावी, यासाठी मधुमेह, रक्तदाब, नाडी परीक्षण, डायट सल्ला, फॅट, टेम्प्रेचर, ऑक्सिजन, प्रकृती परीक्षण या प्रकारच्या तपासणी या आरोग्य शिबिरात मोफत करण्यात आल्या. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिराला ॲड. संतोष पवार, डॉ. दीपक मोरे, डॉ. संत, दीपक सोनवणे, बिट्टू सिंग आदी उपस्थित होते.
युसूफवडगाव येथे सोमवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
===Photopath===
270321\27bed_2_27032021_14.jpg