शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

बीडकरांचा नाद खुळा; धनुभाऊच्या स्वागतासाठी परळीत उभारली सुवर्ण अलंकार कमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 7:03 PM

या कमानीवर सोन्याचे विविध अलंकार लावण्यात आले आहेत

ठळक मुद्देकमानीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून खाजगी सुरक्षा रक्षकदीड क्विंटलच्या पुष्पहाराने होणार स्वागत 

- संजय खाखरे

परळी: सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच ना. धनंजय मुंडे यांचे शुक्रवारी सायंकाळी परळीत शहरात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात ठीक ठिकाणी कमानी उभारल्या आहेत, तर येथील सोनारलाइन रोडवर चक्क सुवर्ण अलंकार कमान उभारली आहे. या कमानीवर सोन्याचे अलंकार लावण्यात आले आहेत अशी माहिती सुवर्णकार समाजाचे नेते सुरेश टाक यांनी दिली 

यापूर्वी परळीत १९८९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत अशीच सोन्याची कमान लावून करण्यात आले होते. मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वागत सोन्याची कमान लावून करण्यात येत असल्याने हे लक्षवेधी ठरत आहे. या कमानीवर सोन्याची एकदाणी, पट्टी गंठण, रानी हार नेकलेस, चैन पट्टी, माणिक-मोती गल सर असे अलंकार लावण्यात आले आहेत प्रत्येक अलंकार पाच तोळ्यांचा असून शहरातील सर्व सुवर्णकार बांधवांनी यासाठी सहकार्य केले आहेत. कमानीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून खाजगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. 

दीड क्विंटलच्या पुष्पहाराने होणार स्वागत याशिवाय शहरात क्रेन द्वारे दीड क्विंटल वजनाचा पुष्पहार घालून ही स्वागत केले जाणार आहे.येथील मोंढा मार्केट भागातील हनुमान मंदिर परिसरात धनंजय मुंडे यांचा नागरी सत्कार होणार आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे याठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेGoldसोनंBeedबीडPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस