छेडछाडीला कंटाळून मुलीने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:36 IST2019-04-08T00:36:07+5:302019-04-08T00:36:37+5:30

अंथरवन पिंपरी येथील एका १७ वर्षीय मुलीला गावातीलच तरूण छेडत होता. याच छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी द्रव प्राशन केले.

The girl attempts to suicide | छेडछाडीला कंटाळून मुलीने घेतले विष

छेडछाडीला कंटाळून मुलीने घेतले विष

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथील एका १७ वर्षीय मुलीला गावातीलच तरूण छेडत होता. याच छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी द्रव प्राशन केले. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. मुलीच्या वडिलांनी सदरील तरूणाविरोधात जबाब दिला आहे.
अंथरवण पिंप्री येथील एका ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलीची गावातीलच एक तरुण सतत पाठलाग करुन छेड काढत असे. मुलीचे आई- वडील ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते. दहा दिवसांपूर्वीच ते गावी परतले आहेत. ३ एप्रिल रोजी सकाळी शौचासाठी म्हणून गेलेली मुलगी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला तेव्हा घराजवळीलच एका शेतात ती अत्यवस्थ स्थितीत आढळली. तिने विषारी द्रव प्राशन केल्याचे निदर्शनास आल्यावर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मुलीच्या वडिलांनी रुग्णालय चौकीत तरुणाविरुध्द जवाब दिला असून उशिरापर्यंत पिंपळनेर ठाण्यात नोंद झाली नव्हती.

Web Title: The girl attempts to suicide