गेवराईजवळ ट्रकमधून ४५ लाखाचा ८० पोते गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:40 IST2019-02-22T13:38:46+5:302019-02-22T13:40:43+5:30
या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे

गेवराईजवळ ट्रकमधून ४५ लाखाचा ८० पोते गुटखा जप्त
गेवराई (बीड ) : तालुक्यातील गढी जवळ हॉटेलवर उभ्या असलेल्या एका ट्रकच्या झडती दरम्यान पोलिसांनी ४५ लाखाचा ८० पोते गुटखा जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विषेश पथकाने गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री उस्मानाबादहून जालन्याकडे जाणारा एक ट्रक (एम.एच 18 ए.ए 6845) गढीजवळ एका हॉटेलवर थांबला. या ट्रकमधून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून रात्री २.३० वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने येथे छापा मारला. ट्रकच्या तपासणीत ४५ लाखाचा ८० पोते गुटखा आढळून आला.
याप्रकरणी एकनाथ दत्तु परदेशी ( 35, श्रीरामपुर ) व शेख जब्बार शेख मुसा (50, जे.पी रोड लोहगाव ) यांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांच्या पथकाने केली.