पहाटपर्यंत रंगलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाठलाग करून ६ जुगारी पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 13:16 IST2023-01-12T13:15:20+5:302023-01-12T13:16:11+5:30
या जुगार अड्ड्यावर खेळण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून जुगारी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पहाटपर्यंत रंगलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाठलाग करून ६ जुगारी पकडले
परळी (बीड) : शहरातील हमालवाडी येथे आज पहाटे केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पथकासह जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून सहा लोकांना पाठलाग करून ताब्यात घेतले. याप्रकरणी 15 जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हमालवाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून साईनाथ उर्फ बंटी माने हा जुगार अड्डा चालवतो. येथे जुगार खेळण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून जुगारी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून स्वतः पंकज कुमावत यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत पहाटे पावणे तीन वाजता जुगार अड्यावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगारी पळून गेली. पोलिसांनी पाठलाग करून सहा जणांना ताब्यात घेतले. तसेच 1 लाख 52 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकूण 15 जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादिवरून कलम 4,5 महा. जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, आंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलिस अंमलदार बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, विकास चोपणे, अनिल मंदे, सचिन अहंकारे, संजय टूले यांनी केली.