परळीजवळ अपेरिक्षा- ट्रव्हल्स अपघातात चार युवक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 10:58 IST2018-04-06T10:58:50+5:302018-04-06T10:58:50+5:30

बीड रोडवरील पांगरी येथे काल रात्री १० च्या सुमारास अपेरिक्षा व  ट्रव्हल्सची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

Four youths killed in Aperikshaw-Travel accident near Parli | परळीजवळ अपेरिक्षा- ट्रव्हल्स अपघातात चार युवक ठार 

परळीजवळ अपेरिक्षा- ट्रव्हल्स अपघातात चार युवक ठार 

परळी (बीड ) : बीड रोडवरील पांगरी येथे काल रात्री १० च्या सुमारास अपेरिक्षा व  ट्रव्हल्सची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात  अपेरिक्षामधील चार युवक जागीच ठार झाले तर जण गंभीर जखमी आहे. सर्वजण पांगरी येथील रहिवासी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काल रात्री १० वाजेच्या दरम्यान पांगरी येथील काही युवक अपेरिक्षाने (एमएच -२३ - एच - ६९१६ ) परळीकडे जात होते. याच दरम्यान नांदेड - पुणे ट्रव्हल्स (एमएच - ०९- बीए - ४३३४ ) बीडच्या दिशेने मार्गस्थ होती. पांगरीजवळ या दोन्ही वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात अपेरिक्षामधील मौजे पांगरी येथील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बन्सी(बाळु)रामभाऊ पाचांगे (24), श्रावण नागोराव पाचांगे (20), सुशिल उत्तम पाचांगे(21), प्रकाश विलास पंडित(21) यांचा समावेश आहे. यासोबतच गंगाधर अशोक पाचांगे हा युवक गंभीर जखमी असून त्यास लातुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती चितांजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघातातील मृत चारही युवक पांगरी येथील रहिवासी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Four youths killed in Aperikshaw-Travel accident near Parli