धारूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील व्यापाऱ्यांना अँटिजन टेस्ट करणे हे बंधनकारक केलेले आहे. १५ मार्च पर्यंत व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली नाही तर त्यांची दुकाने सील करून त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचा इशारा तहसील कार्यालयाने दिला आहे. या कारवाईसाठी शहरात चार पथके नेमण्यात आली आहेत.
हे पथक शहरात फिरून कारवाई करणार आहे. यामध्ये मंडळ अधिकारी नजीर कुरेशी, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी भरत घोळवे, नगरपरीषदेचे लेखा अधिकारी नितीन इजाते यांच्या नेतृत्वाखाली ही चार पथके स्वतंत्रपणे नेमून दिलेल्या विभागात काम करतील. त्यामुळे या कारवाईपासून दूर राहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपल्या टेस्ट करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार वंदना शिडोळकर नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.