शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

माजलगाव-परभणी रोडवर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:41 PM

माजलगाव-परभणी रोडवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला

बीड - माजलगाव-परभणी रोडवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील रहिवासी असलेले व सध्या माजलगाव येथे स्थायिक असलेले दयानंद गणेश सोळंके हे पाडव्यानिमित्त गावाकडे मोरेश्वराच्या दर्शनासाठी जाऊन येत असताना हा अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.

गंगामसला येथील रहिवाशी दयानंद गणेश सोळंके हे जाम समर्थ येथे एका खासगी बँकेत नोकरीला होते त्यांचे राहते घर हे सध्या माजलगाव या ठिकाणी असल्याने ते दिवाळीनिमित्त माजलगावला आले होते. गुरुवारी पाडवा असल्याने ते आपल्या गावाकडील दैवत असलेले मोरेश्वराच्या दर्शनाला जाऊन परत येत असताना हा अपघात झाला. अपघातात दयानंद सोळंके (40), त्यांची पत्नी संगीता सोळंके (36),  मुलगी राजनंदनी (7) व मुलगा पृथ्वीराज  (5) यांचा मृत्यू झाला. माजलगावपासून तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 222 या ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखानाची साखर घेऊन जात असलेल्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटून ट्रक दुचाकीवर उलटल्याने अपघात झाला.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडDeathमृत्यू