पाच महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन तर आज शेतकऱ्याने संपवले जीवन; दोन मुले अनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 19:34 IST2023-02-04T19:33:55+5:302023-02-04T19:34:28+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.

पाच महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन तर आज शेतकऱ्याने संपवले जीवन; दोन मुले अनाथ
- नितीन कांबळे
कडा (बीड): बेलगाव येथील एका तरूण शेतकऱ्याने आज पहाटे गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना घडली. अमोल नवनाथ पोकळे ( ३२ ) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. आई पाठोपाठ वडिलांचे छत्र हरवल्याने दोन लेकर अनाथ झाली आहेत.
आष्टी तालुक्यातील बेलगांव येथील अमोल पोकळे यांच्या पत्नीचे पाच महिन्यापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर पोकळे दोन मुलासह आई-वडिलांचा सांभाळ करत होते. शुक्रवारी जेवण करून ते घरात झोपले होते. तर दोन मुळे आई आजोबांसह बाहेर अंगणात झोपली होती. दरम्यान, आज पहाटे अमोलने घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याचे निदर्शनास आले. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मुत्युची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.