सावरकर महाविद्यालयात विद्यार्थिनींना आर्थिक साहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:34 IST2021-03-18T04:34:07+5:302021-03-18T04:34:07+5:30
बीड : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयांमध्ये गरजू विद्यार्थिनींना आयडीएफसी फर्स्ट भारत बँकेच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आले. ज्या ...

सावरकर महाविद्यालयात विद्यार्थिनींना आर्थिक साहाय्य
बीड : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयांमध्ये गरजू विद्यार्थिनींना आयडीएफसी फर्स्ट भारत बँकेच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आले.
ज्या विद्यार्थिनींना आई किंवा वडील नाहीत अशा गुणवंत विद्यार्थिनींना आर्थिक साहाय्य करण्याच्या योजनेतून आयडीएफसी बँक बीड शाखेच्यावतीने तीन विद्यार्थिनींची निवड करण्यात आली होती. १७ मार्च रोजी महाविद्यालयामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित वैष्णवी दिलीप बरकसे, संगीता संतोष पांडे, राणी सिद्धार्थ सवाई या तीन विद्यार्थिनींना आर्थिक साहाय्य करण्यात आले. बँकेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये अडचण येऊ नये म्हणून मदत केली जात असल्याचे मॅनेजर जॉन पॉल अशोक यांनी सांगितले. यावेळी बँकेचे सीएसआर मॅनेजर शरद देविदास देडे, बीड शाखेचे व्यवस्थापक परवेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी शाम कुनाळे यांची उपस्थिती होती. बँकेने दिलेल्या मदतीचा उपयोग विद्यार्थिनींनी अधिकाधिक गुणवत्ता मिळवण्यासाठी करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर यांनी केले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, कार्यालय अधीक्षक प्रशांत तालखेडकर, शिक्षक-पालक योजनेचे डॉ. गोपाळ धोंड, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
===Photopath===
170321\172_bed_40_17032021_14.jpeg
===Caption===
सावरकर महाविद्यालयांमध्ये गरजू विद्यार्थिनींना आयडीएफसी फर्स्ट भारत बँकेच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आले.