शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

पावसाने पाठ फिरवल्याने १३ हजार हेक्टरवरील उभ्या पिकांवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:51 AM

बीड जिल्ह्यातील १५ गावांतील शेतकऱ्यांची व्यथा

ठळक मुद्देकृषी विभागाने तहसीलदारांना दिला परिस्थिती अहवालपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता 

- राम लंगे 

वडवणी (जि.बीड): शेतकऱ्यांनी उसनवार करून, खाजगी सावकाराचे कर्ज काढून बी-बियाणे, खते घेऊन जूनच्या मध्यंतरी थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावर पेरणी केली होती.  त्यानंतर दोन महिने होऊनही पावसाचा थेंबही न पडल्याने पेरलेले बियाणे उगवून संपूर्णपणे जळून गेले आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांमध्ये शेतकरी संपूर्ण पिकावर नांगर फिरवीत असल्याचे  विदारक चित्र सध्या दिसत आहे. 

प्रशासनाने तात्काळ खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून  नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.तालुक्यातील एकूण पेरणी योग्य ३२ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी यावर्षी कापूस १९ हजार ७८ हेक्टर, तूर १ हजार ८३ हेक्टर, सोयाबीन ४ हजार २०० हेक्टर, बाजरी ३ हजार ९२५ हेक्टर, मूग १०० शंभर हेक्टर व इतर पिकांची २ हजार हेक्टरावरील क्षेत्रावर पेरणी झाली. थोड्या पावसाने कापूस उगवला, मात्र वाढ खुंटली. 

पाऊसच नसल्याने उभे पीक वाळू लागले. १५ गावांमधील ८० टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तब्बल १३ हजार हेक्टरवरील  कापसासह खरीप पिकामध्ये औत घालून आपल्या हाताने पीक मोडून टाकले. चिंचवडगाव, देवडी,  वडवणी, कवडगाव, साळींबा, मामला, मोरेवाडी, पिपरखेड, कान्हापूर, लक्ष्मीपूर, ढोरवाडी,  चिंचोटी, बाहेगव्हाण, हिवरगव्हाण,हरिश्चंद्र पिंप्री, काडीवडगाव, चिंचाळा, पिप्ां्री, येथील शेकडो शेतकऱ्यांनी कापसाच्या उभ्या पिकात औत घालून कापसाचे पीक आपल्या हाताने उद्ध्वस्त केले. कापसासह सोयाबीन, मटकी, मूग, उडीद या पिकांवरही नांगर फिरवावा लागला. तब्बल १३ हजार हेक्टरवरील खरीप पीक आतापर्यंत उद्ध्वस्त केले आहे. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी साळींबा येथील शेतकरी दीपक जाधव, मामला येथील शेतकरी अंगद लंगे, चिचोटी येथील शेतकरी सुमंत गोंडे,अ‍ॅड राज पाटील यांनी तहसील प्रशासनाकडे व कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असून, खरीप हंगामात १५ गावांतील पिके जवळपास ८० टक्के नुकसान झाले असून याबाबत कृषी विभागाने पीक परिस्थिती अहवाल तहसीलदार यांना कळविला आहे. चार दिवसांत पाऊस न पडल्यास तालुक्यातील इतर गावातील परिस्थितीही गंभीर बनण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेतीBeedबीडRainपाऊस