शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

आडत बाजार बंद राहिल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

शेतकरी चिंतेत अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील आडत बाजारपेठ बंद राहिल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. कृषी ...

शेतकरी चिंतेत

अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील आडत बाजारपेठ बंद राहिल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यासाठी आयुक्त, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सभापती, आमदार यांच्यावतीने लेखी निवेदन देऊन बाजार समितीचे व्यवहार सुरू करण्यासाठी वेळ ठरवून परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, २५ तारखेच्या आदेशात पुन्हा आडत बाजाराला लॉक ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीचा व्यवहार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आडत बाजारात होत असतो. शेतकरी शेतीमाल विकून व्यवहार करीत आसतात. शेतकरी सुगीत माल विक्री करीत असले तरी बहुतेक शेतकरी पैसा खर्च होतो म्हणून पेरणीसाठी माल शिल्लक ठेवतात. पेरणीच्या वेळी माल विक्री करून खत, बी, बियाणे खरेदी, मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च हा शेती मालावर भागवतात. गेल्या महिन्यात मोंढा बाजार काही टी घालून दुपारी ११पर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी मोंढा बाजारात आणला आहे. पुन्हा कडक निर्बंध लावत आडत बाजार बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल विक्री न करता आडत दुकानात अडकून पडला आहे.

बाजार समिती सुरू करण्याबाबतचे निवेदन आ. नमिता मुंदडा व कृ.उ.बा. समितीचे सभापती गोंविंद देशमुख यांनी पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले होते. २४ मेच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशात बाजार समितीला पुन्हा लॉकच आसल्याचे नमुद करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. आडत बाजार बंद आसल्यामुळे खत बि बियाणे खरेदी कसे? करावे असा प्रश्न पडला.

गेल्या महिण्यात कांही वेळ आडत सुरू होत्या. त्यामुळे मी कांही शेती माल आडत बाजारात विक्रीसाठी नेला असून राहिलेला माल ही आडत बाजारात पाठवण्याच्या तयारी होतो. पण आडत बाजार बंद केल्याने अर्धा माल दुकानात तर कांही माल घरी पडून आहे. कालच्या आदेशात पुन्हा शासनाने आडत बाजार बंदचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहेत.शासणाने कांही तास तरी मोंढा बाजार सुरू करण्याची परवानगी दिली तरच शेतकरी खत बि बियाणे खरेदी करू शकतील.

सुंदर शिंदे, शेतकरी

शेतकऱ्यानी दुकानात माल टाकला तोही बाजरबंदमुळे आडकला तर कांही माल घरीच राहिला आहे. शेतकरी बाजार सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. शासनाने पुन्हा शेतकऱ्याला प्रतीक्षेतच ठेवल्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने शेतकऱ्याचा विचार करून बाजार सुरु करणे गरजेचे आहे.

संजय भन्साळी,

आडत व्यापारी, अंबाजोगाई.

===Photopath===

290521\img-20210528-wa0101_14.jpg