कापसावर बोंडअळीची लागण झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 19:23 IST2018-08-02T19:23:31+5:302018-08-02T19:23:55+5:30
तालुक्यातील गंगामसला येथील अल्पभुधारक शेतकरी रामेश्वर प्रकाश तायडे (30) याने कापसावर बोंडअळीची लागण झाल्याने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

कापसावर बोंडअळीची लागण झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
माजलगाव (बीड ) : तालुक्यातील गंगामसला येथील अल्पभुधारक शेतकरी रामेश्वर प्रकाश तायडे (30) याने कापसावर बोंडअळीची लागण झाल्याने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
रामेश्वर तायडे यांच्या नावे अर्धा एकर शेत जमीन होती. ते इतर जमिनी कसून आपला उदरनिर्वाह करत. मागील वर्षी त्यांचे पिक हाताचे गेले. तसेच पिकविमा सुध्दा अद्याप मिळाला नाही. यामुळे ते आर्थिक अडचणीत होते. यातच काल ते शेतात गेले असता त्यांना कापसावर बोंडअळीची लागण झाल्याचे निदर्शनास आले. बोंडअळीमुळे हातचे पिक जाणारा यामुळे ते निराश झाले. यातूनच त्यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. रामेश्वर यांच्या एक मुलगा,पत्नी,आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.