farmer suicide : नैराश्यातून विडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 19:33 IST2021-05-10T19:32:43+5:302021-05-10T19:33:15+5:30
farmer suicide विडा येथील शेतकरी अनंत लक्ष्मण पटाईत (४५) यांच्या नावे एक हेक्टर १७ आर जमीन आहे.

farmer suicide : नैराश्यातून विडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या
केज (जि. बीड): तालुक्यातील विडा येथील शेतकऱ्याने बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विचाराने आलेल्या नैराश्यातून सोमवारी सकाळी सात वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.
विडा येथील शेतकरी अनंत लक्ष्मण पटाईत (४५) यांच्या नावे एक हेक्टर १७ आर जमीन आहे. त्यांनी विडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज कसे फेडायचे, या विचाराने आलेल्या नैराश्यात त्यांनी सोमवारी सकाळी सात वाजता विडा येथील शेत शिवारातील मेंडी शेतातील सीताफळाच्या झाडास पांढऱ्या रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी केज पोलिसात गोविंद बालासाहेब पटाईत यांच्या माहितीवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास बाळकृष्ण मुंडे हे करत आहेत.