मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या विस्तार अधिका-याला काळे फासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:11 IST2019-12-31T00:10:09+5:302019-12-31T00:11:44+5:30

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कॉमेंट करणा-या बीड पंचायत समितीच्या विस्तार अधिका-याच्या अंगावर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई ओतली.

An extension officer who spoke abusively about the Chief Minister was blacked out | मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या विस्तार अधिका-याला काळे फासले

मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या विस्तार अधिका-याला काळे फासले

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कॉमेंट करणा-या बीड पंचायत समितीच्या विस्तार अधिका-याच्या अंगावर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई ओतली. ही घटना येथील पंचायत समितीच्या आवारात सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.
सुनील चंद्रकांत कुलकणी असे त्या अधिका-याचे नाव आहे. ते येथील पंचायत समितीमध्ये घरकुल विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्र्ह कॉमेंट केली होती.
त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अ‍ॅड. संगीता चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकाºयांनी कुलकर्णी यांच्या चेह-यावर काळी शाई लावली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाला नव्हता. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. पंचायत समिती आवारामध्ये लोकांमध्ये दिवसभर याविषयी रंगतदार चर्चा दिसून आली. यामुळे कामानिमित्त आलेल्या लोकांची करमणूक झाली.

Web Title: An extension officer who spoke abusively about the Chief Minister was blacked out