खळबळजनक! बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणात फरार नर्सची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 14:53 IST2022-06-08T14:52:03+5:302022-06-08T14:53:48+5:30
Beed illegal abortion case: या प्रकरणी एकमेव फरार असलेल्या आरोपी नर्सने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

खळबळजनक! बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणात फरार नर्सची आत्महत्या
बीड: अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या नर्सचा मृतदेह पाली तलावात ८ जून रोजी आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सीमा सुरेश डोंगरे (३६, रा. डीपी रोड शिक्षक कॉलनी, बीड) असे मयत नर्सचे नाव आहे.
सीता गणेश गाडे ( रा. बक्करवाडी ता. गेवराई) या महिलेचा तीन मुलीनंतर अवैध गर्भपात करण्यात आला होता. अति रक्तस्त्राव होऊन ५ जून रोजी तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अवैध गर्भपात प्रकरणात ७ जून रोजी पोलीस व आरोग्य विभाग यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला. उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड अवैध गर्भपात प्रकरण; एजंट अंगणवाडी सेविकेकडे सापडले २९ लाख, पाचजणांविरोधात गुन्हा
यातील आरोपी पती, सासरा, भाऊ, अंगणवाडी सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ताब्यात असून एकमेव फरार आरोपी सीमा डोंगरे यांनी आत्महत्या केली. घटनास्थळी बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोहेकॉ आनंद मस्के यांनी भेट दिली.
बीडमध्ये अवैध गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू; पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना घेतले ताब्यात